धान्य उत्पादकांची शासनाकडून थट्टा

By Admin | Published: November 21, 2015 12:25 AM2015-11-21T00:25:39+5:302015-11-21T00:25:39+5:30

मागीलवर्षी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर एकरी १२ क्विंटल धान्य खरेदी केले जात होते.

Junk producers joke at government | धान्य उत्पादकांची शासनाकडून थट्टा

धान्य उत्पादकांची शासनाकडून थट्टा

googlenewsNext

भाग्यश्री गिलोरकर यांचा आरोप : जाचक अट रद्द करण्याची मागणी
भंडारा : मागीलवर्षी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर एकरी १२ क्विंटल धान्य खरेदी केले जात होते. परंतु यावर्षी एकरी १२ क्विंटल वरून एकरी ८ क्विंटल वर आणण्यात आले अश्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांनी केली आहे.
मागील वेळी शेतकऱ्यांना सात-बारा हा तलाठी कार्यालयात विनाशुल्क मिळत होता. परंतू त्या सात-बारासाठी आज शेतकऱ्यांना ३० रूपये किंमत मोजावी लागत आहे. तरी शासनाने या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या भावनेशी न खेळता हे निकष पूर्ववत करावे. जेणे करून धान्य उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अशी अपेक्षा भाग्यश्री गिलोरकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Junk producers joke at government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.