ग्रीनफ्रेंड्सतर्फे गुरू- शनी युती दुर्मिळ खगोलीय घटनेचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:30 AM2020-12-24T04:30:21+5:302020-12-24T04:30:21+5:30
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब च्या स्काय वॉच गृपतर्फे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका ...
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब च्या स्काय वॉच गृपतर्फे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी व नेफडो जिल्हा भंडारा तर्फे टेलिस्कोप व दुर्बिणीद्वारा गुरू व शनी ग्रह ४०० वर्षानंतर जवळ आल्याच्या दुर्मिळ प्रसंगाचे निरीक्षण ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात शनिवारला रात्री सहा ते सात या वेळात करण्यात आले.
यावेळी ग्रीनफ्रेंड्स, अखिल भारतीय अंनिस व नेफडोचे जिल्हा सचिव व कार्याध्यक्ष प्रा.अशोक गायधने यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना गुरू व शनी याबद्दल चार्ट व तक्त्याद्वारा माहिती देऊन अनेक नाविन्यपूर्ण माहिती रात्रीच्या खगोल, ग्रह, रास-नक्षत्र, तारे व इतर ग्रहाबद्दल दिली. तसेच विविध रास, नक्षत्र व ग्रहांच्या तसेच ग्रहणाच्या अंधश्रद्धा -गैरसमज दूर केले व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत केला. गुरू ग्रहाचे चार चंद्र लो, युरोपा, कॅलिस्टो व गॅनिमेड याबद्दल तसेच गुरुचा भव्य लाल डाग, शनी ग्रहाचे चारस्तरीय कडे व टायटन या चंद्राबद्दल माहिती दिली. त्यांचे अंतरे, वैशिष्ट्य यावर त्यांनी उद्बबोधक माहिती दिली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारातर्फे आयोजित ''''''''बाबा ते बाबा''''''''अभियानात प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अशोक गायधने यांनी ग्रह नक्षत्रे, फलजोतिष्य व अंधश्रद्धा यावर ऑनलाईन पद्धतीने अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ग्रह, नक्षत्र,रास व तारे ग्रहणे याविषयी केले. शनी, मंगळ या ग्रहाबद्दलचे अंधश्रद्धा व गैरसमज त्यांनी दूर केले त्याचबरोबर "अंधश्रद्धा व तरुणाईचा सहभाग'''''''' याविषयावर अध्यक्षीय विवेचनपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले.
शनी -गुरू युती कार्यक्रमात त्यांनी यावेळी ए.पी. जे अब्दुल कलाम आझाद फाऊंडेशनच्या वतीने १०० उपग्रह देशातील एक हजार विद्यार्थीद्वारा येत्या फेब्रुवारी महिन्यात रामेश्वरम येथून सोडले जाऊन जागतिक, आशिया व भारतीय विक्रम करणार आहेत. त्या मोहिमेची माहिती सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी दिली व या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
गुरू- शनी युतीच्या वैज्ञानिक व खगोलीय कार्यक्रमाला ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, निसर्गमित्र पंकज भिवगडे यांच्यासोबत अथर्व गायधने, छविल रामटेके,अर्णव गायधने,अयान रामटेके, रामन मडामे,साहिल निर्वाण,गौरीश निर्वाण,अथर्व रामटेके, नेहांत निंबार्ते, वेदांत पंचबुद्धे, धीरज नागलवाडे व गजानन गभने या ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिस व नेफडोच्या विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.