अवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:28+5:30
मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाºयांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे.
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेवाडा मार्गातील नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्ते कामासाठी लाखो रूपये खर्च केले असताना अवघ्या चार महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली असून शेतकऱ्यांना ऐन हंगामात कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यानंतर काही दिवसांनी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र काम व्यवस्थित झाले नसल्याचे गावकºयातून ओरड आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालणे, असा गावकऱ्यातून सूर निघत आहे.
मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अड्याळ ते सालेवाडा डांबरीकरण रस्ता.
गत सहा महिन्यात अड्याळसह परिसरात बऱ्याच डांबरी रस्त्यांची कामे झाली. मात्र याचा दर्जा चांगला नसल्याची ओरड सुरू आहे. ग्रामस्थांची रस्त्याबाबत नेहमीच तक्रार सुरू असून याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहे.
कारवाई होत नसल्याने यामागचे गुपीत काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. लाखो रूपयांचा निधी खर्च होत असताना किमान एक वर्षतरी रस्त्याची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे. मात्र अवघ्या दोन ते चारच महिन्यात रस्त्यावर खड्डे पडत असल्याने रस्ता काम गुणवत्तापूर्ण झाले आहे काय, असा प्रश्न नागरिकांतून अधिकाºयांना केला जात आहे.
काहींच्या स्वार्थासाठी नागरिकांना त्रास
शासन ग्रामीण भागातून नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी लाखो रूपयाचा निधी उपलब्ध करून देते. मात्र यंत्रणेतील काही अधिकारी, कंत्राटदार स्वत:च्या स्वार्थासाठी रस्ते काम दर्जेदार करीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची सुरूवात आणि शेवटचे काम बऱ्यापैकी झाले. मात्र मध्यंतरी झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परिणामी रस्त्याची दूरावस्था झाली असतानाही संबंधित यंत्रणेला लक्ष देण्यासाठी वेळ नाही का, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे.