सहा महिन्यांतच रस्त्याला पडले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:23+5:302021-08-26T04:37:23+5:30
साकोली : हाकेच्या अंतरावर असलेल्या परसोडी येथे मागील सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ...
साकोली : हाकेच्या अंतरावर असलेल्या परसोडी येथे मागील सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्ता खराब झाल्यामुळे जाता-येता वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून व अंदाजपत्रकानुसार साहित्य न वापरल्याने रस्ता अल्पावधीतच फुटलेला आहे. या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. संबंधित विभागात विभागातर्फे या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परसोडीवासीयांनी केली आहे. नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून परसोडी येथील भाजीपाला, राइस मिल ते परसोडीच्या चौकापर्यंत लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून शासनाने रस्ता तयार करण्याचे काम एका एजन्सीला दिले होते. त्या एजन्सीमार्फत हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, निकृष्ट साहित्य वापरून कंत्राटदाराने मला एक होऊन हा रस्ता खराब अवस्थेत तयार केलेला आहे. अल्पावधीतच हा रस्ता फुटलेला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.