महिलांसाठी कबड्डी स्पर्धा एक सुवर्णसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:28+5:302021-02-13T04:34:28+5:30
पालोरा येथे समस्त ग्रामवासी व एकलव्य क्रीडा मंडळाच्यावतीने एकदिवसीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ...
पालोरा येथे समस्त ग्रामवासी व एकलव्य क्रीडा मंडळाच्यावतीने एकदिवसीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून सरिता चौरागडे खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे होत्या. कबड्डी स्पर्धचे उद्घाटन पालोराचे सरपंच महादेव बुरडे यांच्याहस्ते पार पडले. मैदान पूजन ढिवरवाडाचे सरपंच धामदेव वनवे, मोहाडी पंचायत समितीच्या माजी सभापती विशाखाताई बांडेबुचे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र शेंडे, सरपंच, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोहर रोटके, करडीचे तंमुस अध्यक्ष वामन राऊत, विश्वनाथ बांडबुचे, ग्रा. पं. सदस्य भोजराम तिजारे, रोशन कडव, मनीषा बुरडे, सुषमा मेक्षाम, पोलीस पाटील वीरेंद्र रंगारी, अमरकंठ मेश्राम, रामेश्वर मेक्षाम, विलास बुरडे तसेच मंडळाचे आयोजक संतोष मेक्षाम, विशाल धांडे, सतीश तिजारे, नीलेश अतकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपंचायत महिला क्रीडा मंडळ, मोहाडी विरुद्ध रवींद्र क्रीडा मंडळ, उमरेड (नागपूर) यांच्यात सामना रंगला. महिला कबड्डी सामने पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संतोष मेश्राम यांनी केले.