सोनी येथे रंगला जावई-सासरे यांच्यात कबड्डी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:43+5:30
जावई व सासरे यांच्यातील कबड्डीचा रोमांचक सामना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे न्यु संमिश्र क्रीडा मंडळाच्यावतीने पार पडला. या सामन्याचे हे ५१ वे वर्ष होते. दिवाळी सणानिमित्त यागावी कबड्डी स्पर्धेचे परंपरेनुसार आयोजन केले जात असते. प्रथेनुसार नवीन जावई विरूद्ध गावातील तरूण मुले ही सासऱ्यांची भूमीका वठवित असतात.
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कबड्डी हा मैदानी खेळ डोळ्यासमोर येताच सात खेळाडू अन् बघ्यांची गर्दी हा प्रसंग आठवतो. असाच एक कबड्डीचा चुरशीचा व तेवढाच गमतीदार कबड्डीचा खेळ सोनी येथे आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा सामना जावई विरूद्ध सासरे असा रंगल्याने पंचक्रोशीतील बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.
जावई व सासरे यांच्यातील कबड्डीचा रोमांचक सामना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे न्यु संमिश्र क्रीडा मंडळाच्यावतीने पार पडला. या सामन्याचे हे ५१ वे वर्ष होते. दिवाळी सणानिमित्त यागावी कबड्डी स्पर्धेचे परंपरेनुसार आयोजन केले जात असते. प्रथेनुसार नवीन जावई विरूद्ध गावातील तरूण मुले ही सासऱ्यांची भूमीका वठवित असतात. झालेल्या रोमहर्षक सामन्यात जावयांनी सासरच्या गटावर दोन गळ्यांनी मात देत सामना जिंकला. परिणामी सासरे वरचढ जावई असा मिश्लियुक्त चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली होती.
या खेळाच्या माध्यमातून जावई व सासºयाचे संबंध दृढ व्हावे व जीवनात खेळाडूवृत्ती जोपासली जावी या उद्देशाने या खेळाडून प्रमुख संदेश दिला जातो. जावयांच्या गटाचे नेतृत्व अरविंद भोयर यांनी तर सासरे गटाचे नेतृत्व निखिल पिलारे यांनी केले. पंचाची भूमीका वसंत एेंचिलवार व महादेव माकडे यांनी उत्कृष्ठपणे पार पाडली.