लवारीत पावसासाठी कलश दिंडी

By admin | Published: August 20, 2016 12:23 AM2016-08-20T00:23:24+5:302016-08-20T00:23:24+5:30

गाव परिसरात पाऊस पडावा आणि जलजीवन सुखी व्हावे. सोबतच गावात शांतता नांदावी ...

Kalash Dindi for rainy season | लवारीत पावसासाठी कलश दिंडी

लवारीत पावसासाठी कलश दिंडी

Next

४९ वर्षांची परंपरा : सातव्या दिवसी झाला समारोप
लवारी : गाव परिसरात पाऊस पडावा आणि जलजीवन सुखी व्हावे. सोबतच गावात शांतता नांदावी यासाठी रक्षाबंधनाला गावकरी कलश दिंडीचे आयोजन करतात. हा दिंडी कार्यक्रम सात दिवस चालतो. मागील ४९ वर्षांपासून ही दिंडी लवारी येथे काढण्यात येत अूसन संपूर्ण ग्रमास्थ या दिंडीत मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने सहभागी होतात.
या दिंडीची सुरूवात सन १९६७ पासून नामदेव क्षिरसागर महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. १९६७ व्या सालात गावात धान पेरणी झाली होती. परे आले पण रोवणीसाठी पाऊस पडलाच नाही. आणि धान परे करपत होते. पाऊसाअभावी गावात रोवणीच झाली नाही. त्यामुळे गावातील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. त्यावेळी नामदेव क्षिरसागर महाराज यांच्याकडे गावकऱ्यांनी धाव घेवून त्यांना याबाबत विचारणा केली. महाराजांनी ग्रामस्थांना सांगितले की, समोर येणाऱ्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून जर गावातील हनुमान मंदिरातून लहान मुलीच्या डोक्यावर कलश घेवून गावातील सर्व मंदिराना प्रदक्षिणा घालून गावातून प्रभातफेरी काढून त्याचा समारोप हनुमान मंदिरात करावा. त्यानंतर कलशामधील पाणी तिथे सोडायचे आणि सातव्या दिवसी त्याचा मोठ्या भक्तीभावाने समारोप करायचा तेव्हाच पाऊस पडेल.
ही गोष्ट लक्षात घेता त्या वर्षात कलश दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीतील मुला मुलींना गंगाबाई पालीवाल यांनी मरेपर्यंत भोजनदान करण्याचे ठरविले. दिंडीच्या शेवटच्या दिवसाला रात्री पावसाने दमदार हजेरी लावली व गावातील रोवणी सुरू झाली, अशी आख्यायीका आहे. त्याची परंपरा मोठ्या भक्तीभावाने पार पडते. तेव्हापासून गेल्या ४९ वर्षांपासून श्रद्धेपोटी लवारी येथे हा उपक्रम सुरू आहे. यंदाही ताळ, ढोलकीच्या तालावर ही दिंडी काढण्यात आली. यात गावातील महिला दिंडीचे पूजन करतात.
या कार्यक्रमाला देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष गजानन किरणापुरे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम कापगते, सचिव दामोधर गोटेफोडे, आसाराम किरणापुरे, बाबुराव नगरीकर, रामचंद्र नागरीकर, लेसमन लांजेवार, देवचंद करंजेकर, यादोराव मेश्राम, चंद्रशेखर कापगते, मोहन समरीत, आत्माराम सोनकुसरे, विजय कटंकार, ताराचंद कटंकार, वसंता कटंकार, मुखरू शेंडे, नंदलाल साखरे, तिर्थराज कोसरे, गोपिचंद किरणापुरे, गौरीशंकर पांडे, शिक्षक टी.टी. कावळे, कल्पना बोडेलकर, निर्मला वाडीभस्मे, पोलीस पाटील विनोद किरणापुरे, मोरेश्वर नगरीकर, डोमा देशकर, मारोती कडूकार यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावातील सर्व समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Kalash Dindi for rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.