सराव शिबिरासाठी कल्याणीची भारतीय रग्बी संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:54+5:302021-08-12T04:39:54+5:30
१० लोक ०४ के भंडारा : उजबेकिस्थान येथे १८ व १९ सप्टेंबरला होणाऱ्या आशियाई स्पर्धेत १८ वर्षांखालील भारतीय मुलींचा ...
१० लोक ०४ के
भंडारा : उजबेकिस्थान येथे १८ व १९ सप्टेंबरला होणाऱ्या आशियाई स्पर्धेत १८ वर्षांखालील भारतीय मुलींचा संघ सहभागी होणार आहे. यात भारतीय रग्बी संघाच्या सराव शिबिरात भंडाऱ्याची रग्बी खेळाडू कल्याणी सिकंदर करवाडे हिची निवड झाली आहे. भारतीय रग्बी संघाचा सराव शिबिर १३ ऑगस्टपासून ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे सुरू होत आहे.
कल्याणीच्या या यशाबद्दल महाराष्ट्र रग्बी असोसिएशनचे सचिव नासीर हुसैन, संदीप मोसमकर, विकास चौरासिया, रहमुद्दीन, जेसीसच्या प्राचार्य रंजना दारवटकर, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सिंग, क्रीडाशिक्षक बेनीलाल चौधरी, सुनील खिलोटे, विजय तायडे, नितीन शुक्ला, प्रशांत घाटबांधे, शिवा पडोळे, पंकज सार्वे यांनी अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या. कल्याणीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश गेडाम, तसेच आई- वडिलांना दिले आहे.