काेराेना परतीचा मार्गावर; लांब पल्यांच्या रेल्वेगाडीत वाढली वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 05:00 AM2022-02-14T05:00:00+5:302022-02-14T05:00:44+5:30
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे अजूनही अनेक प्रवाशी रेल्वेला पसंती देतात. काेराेना संघर्ष काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अनलाॅक प्रक्रियेनंतर गाड्या सुरु झाल्या. भंडारा- वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेलही माेठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु सुपरफास्ट रेल्वे गाड्याच्या संख्येने पॅसेंजर रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे लाेकल गाडी सुरु झाली तर सुपरफास्ट रेल्वेवरील ताण कमी हाेईल. असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेनाची तिसरी लाट परतीच्या मार्गावर असून नागरी वाहतूकीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: रेल्वेगाड्या हाऊसफूल जात असून लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी वेटींग दिसून येत आहे. आतापासूनच प्रवाशांनी दाेन महिन्यांनंतरच्या तिकीटांची बुकींग केल्याचे वास्तव आहे.
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे अजूनही अनेक प्रवाशी रेल्वेला पसंती देतात. काेराेना संघर्ष काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अनलाॅक प्रक्रियेनंतर गाड्या सुरु झाल्या. भंडारा- वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेलही माेठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु सुपरफास्ट रेल्वे गाड्याच्या संख्येने पॅसेंजर रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे लाेकल गाडी सुरु झाली तर सुपरफास्ट रेल्वेवरील ताण कमी हाेईल. असे प्रवाशांचे म्हणणे आहे. काही गाड्यांमध्ये काेराेना नियमांची पायमल्ली हाेत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र काेराेना परतीच्या मार्गावर असल्याने तुर्तासतरी या बाबीकडे सर्वच कानाडाेळा करीत असल्याचे समजते.
या तीन मार्गांवर वेटिंग....
गाेंदिया-मुंबई :
भंडारा राेड रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या गाेंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेसमध्ये वेटिंग दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात ही वेटिंग वाढत असते.
आझाद हिंद :
लांब पल्ल्याच्या या रेल्वे गाडीतही आरक्षीत प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रवाश्यांनी आतापासूनच या गाडीसाठी तिकीट बुकिंग केले आहे.
मुंबई एक्सप्रेस :
मुंबईकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन या दाेन्ही रेल्वेत आतापासूनच तिकीटासाठी वेटिंग दिसून येत आहे. विदर्भाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
मार्चमध्ये बंद झाल्या होत्या रेल्वे
- काेराेना महामारीचा प्रकाेप सुरु हाेताच रेल्वे प्रशासनाने सेवा बंद केली हाेती. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यापर्यंत ही सेवा बंद हाेती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरु करण्यात आली. त्यातही लाेकल आताही बंद आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटातून रोज लाखाची कमाई
काेराेना संघर्ष काळात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर चांगलेच वाढविले हाेते. ५० रुपयापर्यंत हे दर पाेहाेचले हाेते. आता प्लॅटफाॅर्म तिकिट दहा रुपयांना मिळत असले तरी महागड्या तिकिट विक्रीतून रेल्वेला लाखाे रुपयांची कमाई झाली हे विशेष.