काेराेनाने निराधार बालकांच्या जीवनात आशेचा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:06+5:302021-08-18T04:42:06+5:30
भंडारा जिल्ह्यात काेराेनाने नऊ बालकांचे मातृपितृ छत्र हरविले. शासनाने मदतीची घाेषणा केली; परंतु अद्यापही या बालकांपर्यंत ती पाेहाेचली नाही. ...
भंडारा जिल्ह्यात काेराेनाने नऊ बालकांचे मातृपितृ छत्र हरविले. शासनाने मदतीची घाेषणा केली; परंतु अद्यापही या बालकांपर्यंत ती पाेहाेचली नाही. शास्त्रीय साेपस्कारात ही बालके अडकली आहेत. अशा या बालकांसाठी राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील नऊही बालकांच्या घरी जावून त्यांची विचारपूस करण्यात आली. नरसिंगटाेला, कांद्री, खापा, तुमसर या गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, माेहाडी तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जया साेनकुसरे, ओबीसी सेलचे माजी सदस्य राजू माटे, महादेव पचघरे, महिला अध्यक्ष रीता हलमारे, राजेंद्र मेहर, सुनील थाेटे, ठाकचंद मुंगुसमारे, सुदीप ठाकूर, विजय बारई, प्रणाल ठवकर यांनी भेट दिली.
त्यांना अन्न सुरक्षा याेजनेच्या लाभासाठी तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधण्यात आला. शिक्षणात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून राष्ट्रवादी युवक दूत नियुक्त करण्यात आले. प्रत्येक युवक दूताकडे एका निराधार बालकाची जबाबदारी देण्यात आली.
बाॅक्स
ताडपत्रीच्या झाेपडीत दाेन भावंडांचा निवास
माेहाडी तालुक्यातील नरसिंगटाेला येथील आई-वडील गमावलेले दाेन भावंडे आपल्या वृद्ध आजी-आजाेबाकडे राहतात. घर नसल्याने ताडपत्रीच्या झाेपडीत त्यांचा निवास आहे. याबाबत आजी-आजाेबांना विचारले असता, पंचायत समितीतून आम्हाला घरकुल याेजना मिळाली आहे. दाेन हप्ते मिळाले; परंतु पुढचे पैसे मिळाले नाही, असे सांगितले. यावरून पंचायत समिती व जिल्हा विकास यंत्रणेसाेबत संपर्क साधून घरकुलाचे पैसे तत्काळ देण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला.
बाॅक्स
बालसंगाेपणाचा लाभच नाही
शासनाने काेराेनामुळे अनाथ झालेल्या बालकांना बालकल्याण विभागाच्यावतीने मदत देण्याची घाेषणा केली हाेती; परंतु आता चार महिने झाले तरी अद्याप या बालकांना काेणतीच मदत मिळाली नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत साेनकुसरे यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा दाेन दिवसात या मुलांच्या खात्यात पैसे जमा हाेतील, असे सांगितले.