भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:36 AM2020-05-06T10:36:00+5:302020-05-06T10:39:10+5:30
तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून पाणी नाल्याला वाहत असल्याचे बुधवारी पहाटे नागरिकांच्या लक्षात आले आहे. या कालव्यातील पाणी जवळपासच्या शेतात शिरत असल्याने धान पीक संकटात आले आहे.
तुलसीदास रावते
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून पाणी नाल्याला वाहत असल्याचे बुधवारी पहाटे नागरिकांच्या लक्षात आले आहे. या कालव्यातील पाणी जवळपासच्या शेतात शिरत असल्याने धान पीक संकटात आले आहे.
कारली-चिचोली वितरिकेवरुन कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली येथील उन्हाळी धानपिकासाठी जानेवारी पासून पाणी मिळत आहे.धान लोम्बीवर असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. अशातच विभागाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा ओव्हर टॉक होऊन फुटला असे सांगण्यात आले.
कोरोना संकटामुळे शेतकरी डबघाईस आलेले असून शेवटच्या सिंचनाअभावी पिकात घट होईल या विवंचनेत शेतकरी आहे. या कालव्या अंतर्गत शेकडो एकरात धान पीक असून ते नष्ट होण्याची भीती आहे.
कालवा फुटलयाने पाण्याचा अपव्यय झाला शेतकऱयांचे करोडोचे नुकसान होऊ नये अशी दक्षता घेऊन त्वरित कालवा दुरुस्त करण्यात यावा व हा कालवा बरेच वर्षांपूर्वी बनलेला आहे त्याचे कायमचे सिमेंटद्वारे मजबुतीकरण करण्यात यावे जेणे करून पूर्ण समस्या दूर होईल
डॉ. हरेन्द्र रहांगडाले
चिचोली
कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक
सिंचन विभागाच्या लाफरवाही मूळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा फुटला शेतकऱ्याचा कोट्यवधीचा नुकसान होऊ नये याबाबद ताबडतोब दुरुस्त करण्यात यावे व 20 मे पर्यंत पाण्याचा सिंचन करावे
प्रतिमा अशोक ठाकूर
सरपंच बघेडा