कार्तिक ठरला संगणक प्रमाणपत्रधारक पहिला नाथजोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:37 AM2021-04-20T04:37:03+5:302021-04-20T04:37:03+5:30

लाखांदूर : हस्तरेषा पाहून भीक मागण्याच्या परंपरागत व्यवसायातही त्याने शिक्षणाचे वेड जोपासले. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तो पदवीचे शिक्षण घेत ...

Karthik became the first Nathjogi to hold a computer certificate | कार्तिक ठरला संगणक प्रमाणपत्रधारक पहिला नाथजोगी

कार्तिक ठरला संगणक प्रमाणपत्रधारक पहिला नाथजोगी

Next

लाखांदूर : हस्तरेषा पाहून भीक मागण्याच्या परंपरागत व्यवसायातही त्याने शिक्षणाचे वेड जोपासले. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तो पदवीचे शिक्षण घेत असतानाच एमएससीआयटी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होऊन नाथजोगी समाजातील पहिला संगणक प्रमाणपत्रधारक ठरला आहे. ही यशोगाथा आहे लाखांदूर तालुक्यातील कोदामढी येथील कार्तिक मोहनलाल वडस्कर (२४) नामक नाथजोगी युवकाची.

नाथजोगी समाजात जन्मलेल्या या युवकावर बालपणात गावोगावी भटकून भिक्षा मागण्याचे वंशपरंपरागत संस्कार होत असतानाच त्याला शिक्षणाची आवड झाली. ही आवड जोपासताना त्याला कुटुंबीयांनीदेखील सहकार्य केले. रुढी, परंपरांच्या जोखडातून बाहेर पडताना त्याने बालविवाह न करता या समाजात जागृतीचे जणू पहिले पाऊल टाकले. सध्या तो बीए पदवीचे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून नुकतीच एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

गावोगावी भटकून भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्या नाथजोगी समाजात शिक्षणाची जागृती करण्यासाठी त्याने अनेकदा पालावरची शाळा भरवून या समाजातील लहान, मोठ्यांना शिक्षणाचे धडे देणे चालविले आहे. वर्षानुवर्षांपासून परंपरागत व्यवसाय, अनिष्ट रुढी, परंपरांना मूठमाती देत या युवकाने शिक्षणाचे वेड जोपासत स्वत: समाजात शैक्षणिक क्रांतीसाठी धडपड करून नाथजोगी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत या युवकाला शासन, प्रशासनाच्या पुढाकाराची गरज असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान,, परंपरागत व्यवसायातून कुटुंब पोषणाच्या नादात शिक्षणापासून वर्षानुवर्षे उपेक्षित ठरलेल्या नाथजोगी समाजातील कार्तिकने शिक्षणाची कास धरून संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होत या समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Karthik became the first Nathjogi to hold a computer certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.