भंडाऱ्यातील कवलेवाडा वांगी धरण ठरतंय 'सुसाईड पॉइंट', पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 06:21 PM2023-05-17T18:21:28+5:302023-05-17T18:22:06+5:30

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा वांगी गावांचे शेजारील धरण सुसाईड पॉइंट ठरत आहे.

Kavalewada Vangi dam is becoming a suicide point again a young man committed suicide | भंडाऱ्यातील कवलेवाडा वांगी धरण ठरतंय 'सुसाईड पॉइंट', पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या

भंडाऱ्यातील कवलेवाडा वांगी धरण ठरतंय 'सुसाईड पॉइंट', पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर  

भंडारा : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा वांगी गावांचे शेजारील धरण सुसाईड पॉइंट ठरत आहे. या धरणात दोन्ही जिल्ह्यातील तरुणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हरदोली येथील योगेश नंदलाल बोपचे (२२) या तरुणाचा मृतदेह आढळला.

सिहोरा परिसरातील हरदोली येथील योगेश नंदलाल बोपचे या २२ वर्षीय तरुणाने नैराश्यातून १५ मे रोजी धरणात उडी घेतली. धरणाच्या मार्गावर त्याने मोटारसायकल उभी ठेवली आहे. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास योगेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत धरणातील पाण्यात आढळला. वडिलांच्या निधनानंतर योगेश हा आईचा एकुलता आधार होता. तरुणाई नैराश्यातून जीवघेणे निर्णय घेत आहेत. यामुळे चिंता वाढल्या आहेत. आत्महत्येचे कारण कळले नाही.
 
धरण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे
नदीच्या पात्रात जाण्यास मज्जाव घालणारे फलक लावण्यात आले असले फलकाला बेदखल करीत धरणाच्या ऊर्ध्व भागात पर्यटक जात आहेत. या ऊर्ध्व भागात अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत. पोहण्याच्या नादात अनेक तरुणांनी जीव गमावला आहे. या भागात खोल डोह असल्याचे सांगितले जाते. नैराश्यातून तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. धरण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पथदिवे लावण्यात आले आहेत.
 
पर्यटकांना भुरळ
धापेवाडा उपसा सिंचन योजना आणि अदानी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर कवलेवाडा वांगी गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे सिहोरा आणि तिरोडा शहराचे अंतर १३ किमीचे झाले असून तिरोडा आगाराच्या बसेस चांदपूर देवस्थानपर्यंत धावत आहेत. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पर्यटकांना भुरळ घालत आहे. ३० किमी अंतरापर्यंत नदीच्या पात्रात पाणी अडविण्यात आले आहेत.

Web Title: Kavalewada Vangi dam is becoming a suicide point again a young man committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.