ध्येय ठेवा, यश नक्की मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:00 AM2018-04-03T00:00:48+5:302018-04-03T00:00:48+5:30
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत यश संपादन करावयाचे असेल तर ध्येय समोर ठेवून परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते. शाळेचे प्रसन्न वातावरण महत्त्वाचा भाग आहे. जि.प. शाळा ही ग्रामस्थांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत यश संपादन करावयाचे असेल तर ध्येय समोर ठेवून परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते. शाळेचे प्रसन्न वातावरण महत्त्वाचा भाग आहे. जि.प. शाळा ही ग्रामस्थांची आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, नवनवीन योजना उपक्रमाकरिता शिक्षक पालक तसेच गावकऱ्यांचा योग्य सहकार्य घ्यावे. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी हे विद्यार्थी व शिक्षक यातील महत्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था भंडारा व पंचयत समिती भंडाराच्या वतीने धारगाव केंद्रांतर्गत येणाºया जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल गुंथारा येथे तालुकास्तरीय एसएमसी सदस्यांचे सक्षमीकरण मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उद्घाटन पंचायत समिती सदस्य टेकराम पडोळे यांनी केले व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती पवन कोरामे, उपसभापती वर्षा साकुरे, सरपंच शुभांगी सार्वे, उपसरपंच दिलीप कायते, सेवानिवृत्त प्राचार्य परसराम सार्वे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, केंद्रप्रमुख राजश्री शिंदे, एस.एस. घुग्गुसकर, प्रदीप काटेखाये, साठवणे, प्राचार्य प्रदीप मुटकुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू सयाम, उपाध्यक्ष जितेंद्र मुटकुरे, पंचायत समितीचे माजी सदस्य श्याम सार्वे, गोवर्धन साकुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आय.बी. तरारे, मुख्याध्यापक बी.एम. गायधने, माजी. जि.प. सभापती संजय गाढवे, सुकराम पडोळे आदी उपस्थित होते.