सकारात्मक विचार ठेवून कुठलेही काम मनापासून करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:00 PM2019-01-21T23:00:02+5:302019-01-21T23:00:18+5:30
कुठल्याही क्षेत्रात आपण काम करीत असतांना सकारात्मक विचार ठेवून आणि मनापासून काम केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. फळ चांगले हवे असेल तर कामही चांगले करावे लागते, असे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले.
भंडारा : कुठल्याही क्षेत्रात आपण काम करीत असतांना सकारात्मक विचार ठेवून आणि मनापासून काम केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. फळ चांगले हवे असेल तर कामही चांगले करावे लागते, असे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहचविल्या जातात. लोक कल्याणकारी योजनांची माहिती पोहचविण्यासाठी आम्ही सकारात्मक दुष्टीकोण ठेवतो. सामाजिक जाणिवा जोपासत शेवटच्या घटकांपर्यंत माहिती कशी पोहचेल आणि त्याला लाभ कशा होईल याचा आम्ही विचार करतो. आपण केलेले चांगले कामच आयुष्यभर लक्षात राहते. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते. आणि वाईट काम केल्याच वाईट फळ मिळणार हे निश्चितच. त्यामुळे प्रत्येकाने या मकरसंक्रातीच्या पर्वापासून मनापासून सकारात्मक काम करण्याची गरज आहे. आपल्या कामातून आनंद मिळवत समाजहित जोपासले पाहिजे, असे रवी गिते म्हणाले.
द्वेष आणि मत्सराचा मनावर आणि शरीरावरही विपरित परिणाम होतो. सकारात्मक विचार ठेवल्यास त्यातून निश्चितच चांगले घडू शकते. नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी ‘लोकमत’ ची ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम अतिशय उपयुक्त असल्याचे गिते म्हणाले.