उज्ज्वलानंतर केरोसीन बंद, गरिबांची रात्र अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:53+5:302021-09-03T04:36:53+5:30
ग्रामीण भागात पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर केरोसीनचा वापर करून दिवा लावून रात्रभर वीज आली नाही ...
ग्रामीण भागात पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर केरोसीनचा वापर करून दिवा लावून रात्रभर वीज आली नाही तरी प्रकाशाची अडचण येत नव्हती. मात्र, शासनाने ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती वापराचे सिलिंडर वितरित करून केरोसीनचे वाटप बंद केले. या स्थितीत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पावसाळ्याच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने केरोसीन अभावी रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे वास्तव आहे.
ग्रामीण भागात पावसाळ्यात सगळीकडेच चिखल व दुर्गंधीचे वातावरण पहावयास मिळते. गावालगतच शेती असल्याने गावात घरोघरी विविध कीटकांचा वावर दिसून येताे. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने तर, दुसरीकडे केरोसीनचा पुरवठा होत नसल्याने रात्रीच्या दरम्यान अंधारात कीटकांची भीती वाढली आहे.
शासनाकडून केरोसीन उपलब्ध करण्याची गरज आहे.
बॉक्स
दर महिन्याला केरोसीनचा पुरवठा करा
ग्रामीण भागात रात्रीच्या दरम्यान वीजपुरवठा बंद होत असल्याने सर्व कुटुंबांना केरोसीनच्या अभावी अंधारात रहावे लागत आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विविध कीटकांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत ग्रामीण भागातील रेशन दुकानांद्वारे प्रतिमहिना एक लीटर केरोसीनचा पुरवठा करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.