जीवनाची किल्ली युवकांच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:22 AM2017-06-20T00:22:49+5:302017-06-20T00:22:49+5:30
सोळावं-सतरावं वर्षे हे परिवर्तनाचे वर्षे आहे. मेंदूला योग्य वळण लावणार आहे. स्पर्धापरीक्षे विषयी ग्रामीण युवकामध्ये यशस्वी विषयी सभ्रम आहे.
करिअर मार्गदर्शन शिबिर : राम वाघ यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : सोळावं-सतरावं वर्षे हे परिवर्तनाचे वर्षे आहे. मेंदूला योग्य वळण लावणार आहे. स्पर्धापरीक्षे विषयी ग्रामीण युवकामध्ये यशस्वी विषयी सभ्रम आहे. स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन दुरू सारा. यातून आत्मविश्वासाला बळ मिळतो. प्रश्न म्हणजे इच्छा नाही. इच्छामुळे जीवन घडत नाही. इरादाने जीवन घडतो. त्यासाठी सामर्थबुद्धी जागृत असावी. परिणामी जिवनाची रेलगाडी चालविण्याची चाबी युवकांच्या हातात आहे, असे प्रतिपादन आकार फाँडेशनचे संचालक राम वाघ यांनी केले.
संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना व ओम सत्यसाई कला विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात करीअर मार्गदर्शन शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून राम वाघ बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे हे होते. यावेळी नेटवर्क संगठण येजुकेशनचे संचालक जगदीश वैद्य, संस्था सचिव चंद्रशेखर गिरडे, कोषाध्यक्ष अरविंद आकरे, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ कृपाण उपस्थित होते. जगदीश वैद्य म्हणाले की, परिवर्तनशिल वर्षाकडे पाहणाऱ्या दृष्टीकोन सकारात्मक, असावा करीअर प्रगतीसाठी आवड, क्षमता निर्माण करा, अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे म्हणाले की संत जगनाडे महाराज तेली समाज संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ कृपाण उपस्थित होते.
जगदीश वैद्य म्हणाले की, परिवर्तनशिल वर्षाकडे पाहणाऱ्या दृष्टीकोन सकारात्मक, असावा करीअर प्रगतीसाठी आवड, क्षमता निर्माण करा, अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे म्हणाले की संत जगनाडे महाराज तेली समाज संघटनाचे कार्य वाखाण्याजोगे आहे. यांचे युवकांनी आपल्या अंगी गुण घ्यावे. दिशाहीन जीवन जगण्यापेक्षा गुणवत्तापुर्ण व सुसंस्कृत जीवन जगावे. यासाठी यशाची थोरामोठाचे आदर्श पुढे ठेवून पुढील कार्य करावे. आपण आपल्यामधील आत्मविश्वास जागृत करावा, यशस्वी जिवनाचे शिल्पकार बना, एक दिवशीय शिबिराप्रसंगी परिसरातील युवक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे आई-वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रशेखर गिरडे यांनी केले. संचालन आभार इंद्रजित कुर्झेकर यांनी केले. यशस्वितेसाठी तेली समाज संघटना पदाधिकारी, सदस्य, महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.