महालगाव नाकाडोंगरी मार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:29 PM2017-09-10T23:29:28+5:302017-09-10T23:29:57+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग राज्याच्या अखत्यारीतील नाकाडोंगरी महालगाव मार्गाची रेतीच्या ओव्हरलोडेड वाहतुकीने दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सार्वजनिक बांधकाम विभाग राज्याच्या अखत्यारीतील नाकाडोंगरी महालगाव मार्गाची रेतीच्या ओव्हरलोडेड वाहतुकीने दुरवस्था झाली आहे. मार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकांना पैदल चालणे मुश्किल झाले आहे. रेतीचे ट्रक बंद करण्याची मागणी होत आहे.
सिहोरा परिसरात असणाºया वैनगंगा नदीच्या खोºयातून रेतीचा ुपसा सुरु आहे. या रेतीची निर्यात मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. मांडवी गावानजीक वैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येत असला तरी ट्रक मध्ये ओव्हरलोडेड रेती भरली जात आहे. सिहोरा पोलीस स्टेशनच्या समोरील मार्गाने या ट्रकची वाहतूक सुरु आहे. महालगाव नाकाडोंगरी या जंगल व्याप्त १८ कि.मी. नंतरच्या मार्गावर ओव्हरलोडेड रेतीच्या वाहतुकीने २ ते ३ फुट खोल खड्डे पडली आहे. या मार्गावरील पुलाचे बांधकाम घटली असून अपघाताला आमंत्रण देत आहे. कोट्यवधी रुपयाचा खर्च मार्ग दुरुस्तीकरिता येणार आहे. रेत माफियांना ओव्हरलोडेड रेतीची वाहतूक करण्याची मंजूरी देण्यात आल्याचे चित्र परिसरात आहे. या ट्रक व माफियावर आजपर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याने गावकºयांना ही बाब खटकणारी आहे. पोलिसांना बाय बाय करीत ही रेतीची ओव्हरलोडेड ट्रक पोलीस स्टेशनचे समोरून पोबारा करीत आहेत. राज्य मार्गाची वाहतुकीने दुरावस्था झाली असताना प्रशासन आणि पुढारी शांत आहे. नाकाडोंगरी महालगाव मार्गावर वारपिंडकेपार, कवलेवाडा, सोंड्या, पाथरी, सक्करधरा गावे आहेत. याच मार्गावर माजी खासदार शिशुपाल पटले आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांचे गृहगाव वारपिंडकेपार गाव आहे. या गावात य जा करणारा मार्ग नासधुस झाला आहे. की लोकप्रतिनिधी एरवी रास्ता रोको आंदोलनासाठी चर्चेत आहेत. परंतु त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे. सिहोरा, चुल्हाड, बपेरा आणि आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातून जाणारा हा एकमेव रस्ता रेतीच्या ओव्हरलोेडेड वाहतुकीने त्रासदायक झाला असताना जि.प. सदस्य ते पं.स. सदस्य शांत बसली आहे. ग्राम पंचायतीची आचारसंहिता असल्याने सर्वांनी डोळे बंद केल्याची माहिती मिळाली आहे. याच संधीचा फायदा रेतीचे माफीया यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. दर तासाला ट्रकच्या संख्येत वाढ झाली आहे. भरधाव वेगात या ट्रकची वाहतूक सुरु आहे. विद्यार्थी आणि नागरिकांचे जीव धोक्यात आली आहे. समाज रक्षणाची जबाबदारी सांभाळणारे रस्ते सोडून रेती घाटावर ट्रॅक्टरचा शोध घेत आहेत. सिहोरा परिसरात असुरक्षितता असल्याने ही वाहतूक बंद करण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत.