खामगाव एमआयडीसीला २०२० पर्यंत मिळणार 'जिगांव'चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:42 PM2018-07-24T15:42:55+5:302018-07-24T15:45:41+5:30

लवकरच जिगांवचे पाणी खामगाव एमआयडीसीला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

Khaggaon MIDC gets water from Jigaon by 2020 | खामगाव एमआयडीसीला २०२० पर्यंत मिळणार 'जिगांव'चे पाणी

खामगाव एमआयडीसीला २०२० पर्यंत मिळणार 'जिगांव'चे पाणी

Next
ठळक मुद्देज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. धरणात मुळातच पाणी कमी असल्याने खामगाव एमआयडीसीची पाण्याची भूख हा प्रकल्प भागवू शकत नाही. खामगाव एमआयडीसी परिसरातून जिगांव प्रकल्पातून येणारी मुख्य पाईपलाईन गेलेली आहे.

- गजानन राऊत
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. भर पावसाळयात सुध्दा टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उद्योगांना तर नेहमीच पाण्याची चणचण भासवते. त्यामुळे नवीन उद्योग उभारणीस येत नाही. परंतु आता हा प्रश्न कायमचा निकाली लागणार असून लवकरच जिगांवचे पाणी खामगाव एमआयडीसीला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यासाठी प्रशासकीय लेवलवर जोरदार हालचाली सुरु आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र खामगावला आहे. आधीचे २६७ हेक्टर आणि आता नव्याने २५६ हेक्टर क्षेत्र खामगाव एमआयडीसीला उपलब्ध होणार आहे. या एमआयडीसीमध्ये २०० हून अधिक कारखाने आहेत. हजारो कामगार याठिकाणी आपली उपजिविका भागवतात. परंतु अत्यल्प पावसामुळे एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा हा नेहमी खंडीत होत राहतो. त्यामुळे बरेच उद्योग बंद राहतात. पर्यायाने उद्योजकांवर तर संक्रांत येतेच त्याचबरोबर कामगारांवर सुध्दा उपासमारीची पाळी येत असते. 
ज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. परंतु या धरणात मुळातच पाणी कमी असल्याने खामगाव एमआयडीसीची पाण्याची भूख हा प्रकल्प भागवू शकत नाही. हे गोष्ट लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर जिगांव प्रकल्पाचे पाणी जर खामगाव एमआयडीसीला घेता आले तर याठिकाणचा पाणीप्रश्न नेहमी सूटू शकतो असे प्रथमदर्शनी लक्षात आले आणि तशा हालचाली सुरु झाल्या. 
खामगाव एमआयडीसी परिसरातून जिगांव प्रकल्पातून येणारी मुख्य पाईपलाईन गेलेली आहे. त्यामुळे याठिकाणी पाणीपुरवठा करणे सोपे होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेता एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी बैठक घेऊन प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करण्याचे निश्चित केले असून लवकरच ही खुशखबर व्यापाºयांना आणि उद्योजकांना तसेच परिसरातील नवीन उद्योग सुरु करणाºया युवकांना मिळणार आहे. या विषयी खामगाव एमआयडीसीचे उपविभागीय अभियंता रवींद्र खरात यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 
 
खामगाव एमआयडीसीची गरज लक्षात घेता. वरिष्ठ पातळीवर जिगांव प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी हालचाली सुरु असून, लवकरच याबाबतीत निर्णय होणार आहे. त्यामुळे खामगाव एमआयडीसीचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.
-  रवींद्र खरात, उपविभागीय अभियंता, एमआयडीसी खामगाव.

Web Title: Khaggaon MIDC gets water from Jigaon by 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.