कोविड लसीकरण मोहीमेसाठी खराशी ग्रामपंचायत सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:38+5:302021-05-03T04:29:38+5:30
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान खराशी : विविध उपक्रमशील ग्रामपंचायत गाव म्हणून ओळख असलेली खराशी ग्रामपंचायत कोविड लसीकरण मोहिमेत नव्वद ...
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
खराशी : विविध उपक्रमशील ग्रामपंचायत गाव म्हणून ओळख असलेली खराशी ग्रामपंचायत कोविड लसीकरण मोहिमेत नव्वद टक्के लसीकरण करून तालुक्यात अव्वल ठरली असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. लाखणी तालुक्यातील मुरमाडी/तूप आरोग्य केंद्रांतर्गत
ग्रामपंचायत खराशीने राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारांतर्गत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील ४५ वर्षे ते अधिक वयोगटातील लोकांचे नव्वद टक्के लसीकरण पूर्ण केले असून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी खराशी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधन्वा चेटुले ग्रामसेवक रवी टोपरे यांनी सन्मानपत्र स्वीकारले. या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम, आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.