खरबीचा अल्पभूधारक शेतकरी बनला उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:05+5:30

धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आकरे यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला.

Kharbi's smallholder farmer became an entrepreneur | खरबीचा अल्पभूधारक शेतकरी बनला उद्योजक

खरबीचा अल्पभूधारक शेतकरी बनला उद्योजक

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : पनीरची विक्रमी विक्री, कोरोना संकाटकाळात अन्य व्यवसायिकांना दिली प्रेरणा

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू होताच दुध संकलन बंद झाले. मात्र अशा संकटातून आशेचा किरण शोधत भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथील शेतकरी धनराज आकरे याने कुटुंबियाच्या मदतीने पनीर तयार करुन सोशल मीडियाच्या आधाराने पनीरची विक्रमी विक्री केली.
धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आकरे यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. लॉकडाऊनपुर्वी आकरे आपल्या गावातील दुध डेअरीत दुध घालायचे. मात्र कोरोना प्रादूर्भाव वाढताच दुध खरेदी बंद झाली. दररोज निघणारे २५ लिटर दुधाचे काय करायचे असा प्रश्न त्यांना सतावू लागला. सुरुवातीला चार दिवस गावातच नातेवाईक तसेच मित्र मंडळीना नि:शुल्क दुधाचे वितरण केले. कोरोनाच्या धास्तीने दुधाचे घरोघरी वाटप बंद झाले. पत्नी शामकला यांच्या कल्पनेतून जर आपण पनीर करुन विक्री केली तर यातूनच त्यांनी मुलगा रोहित, मुलगी हिमांशी, आई-वडील यांच्या मदतीने पनीर बनवायला सुरुवात केली. पहिले तीन दिवस पनीर घेण्यासाठी कुणी तयार होत नव्हते. मात्र काही मित्रांनी कोरोनाबाबत घेतलेल्या दक्षतेची हमी दिल्यावर पनीर खरेदी केले. त्यानंतर शेतकरी सेवार्थ दुध तसेच गावातील इतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माहिती टाकताच हळूहळू आॅर्डर येवू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. यातूनच निघणाऱ्या २५ लिटर दुधाचे पनीर तयार करुन परिसरातील गावात विक्री करण्याचे ठरविले. अल्पवधीतच पनीरसाठी आॅर्डर येवू लागले. यावेळी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पनीर खरेदीविषयी आवाहन केले. शिथिलतेमुळे ग्राहक विक्री योजनेतून भाजीपाला विकण्यासही सुरुवात केली. पनीर विक्रीतून दीड महिन्याचे ५० हजाराचे नुकसान तर टळेलच याशिवाय अपेक्षीत नफाही मिळाला.

अचानक दुध विक्री बंद झाल्याने पनीर निर्मितीचा निर्णय घेतला. अल्पावधित याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे.
-धनराज आकरे, दुध उत्पादक शेतकरी, खरबी
लॉकडाऊनमुळे सगळेच जग बदलून गेले आहेत. शेतकºयांनी गटाच्या माध्यमातून व्यवसाय करीत थेट विक्री केल्यास भविष्यात खूप चांगले दिवस येतील.
-रेणुका दराडे, कृषी सहायक परसोडी

Web Title: Kharbi's smallholder farmer became an entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.