खरीप पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:01:01+5:30

कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या नाबार्डच्या परतफेडीनुसार या परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.

Kharif crop loan repayment extended till 31st August | खरीप पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

खरीप पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Next
ठळक मुद्देजिल्हा बँकेची माहिती । लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशास्थितीत त्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले होते. आता त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी गत हंगामात घेतलेल्या संस्था अथवा बँकांमार्फत पीक कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट झाली असून ही मुदत पूर्वी ३१ मे होती. वाढीव मुदतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या नाबार्डच्या परतफेडीनुसार या परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी तसेच १ लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध होण्यासाठी २००६ पासून राज्य शासन बँकांना पीक कर्जावर व्याज परतावा देत आहे. राज्य शासनाच्या या योजनेमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांचे अल्पमुदतीचे पीक कर्ज सात टक्के व्याजदराने उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी केंद्र शासन बँकांना २ टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देत आहे.
केंद्र शासनाच्या योजनेच्या धरतीवर बँकांनी तीन लाखापर्यंतचे अल्पमुदती पीक कर्ज राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिल्यास राज्य शासन बँकांना एक टक्का दराने व्या परतावा देत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या व्याज परतावा योजनेनुसार शेतकऱ्यांनी बँकाकडून उचल केलेल्या अल्पमुदती पीक कर्जाची परतफेड केल्यास विहित केलेल्या व्याज दराने परतावा केल्याचे सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेने २७ मार्चच्या परिपत्रकाद्वारे १ मार्च ते ३१ मे या कालावधीत परतफेडीस पात्र असणारी कर्जे पुढील तीन महिन्यांसाठी अधिस्थगित केली आहे. शेतकऱ्यांना दंड बसू नये म्हणून अधिस्थगित कालावधीसाठी पीक कर्जास परतावा अनुज्ञेय केलेला आहे. पीक कर्ज परतफेडीची मुदतवाढ झाल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकरी सभासदांनी त्यांच्याकडील पीक कर्जाची परतफेड अद्याप केली नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक

Web Title: Kharif crop loan repayment extended till 31st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.