खरिपाच्या तोंडावर बाजारात जनावरांचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:18 PM2019-05-10T22:18:07+5:302019-05-10T22:19:04+5:30

पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे.

In Kharipa's mouth, the prices of animals rose in the market | खरिपाच्या तोंडावर बाजारात जनावरांचे भाव वधारले

खरिपाच्या तोंडावर बाजारात जनावरांचे भाव वधारले

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : बैलांची संख्या रोडावली, मजुरी, बियाणे, खते आदींचे दर वाढले

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी(पालोरा) : पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे. देव्हाडा येथील प्रसिध्द गुरांचा बाजारात जनावरांच्या किंमतीत अचानक सात हजार रुपयापर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहेत.
तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथील बैलबाजार प्रसिध्द आहे. पुर्व विदर्भातील अनेक व्यापारी येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. दर बुधवारी देव्हाडीचा बैलबाजार भरतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी जनावरे खरेदीसाठी येथे येतात. दर आठवड्याला येथील बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. सध्या शेतीहंगामाचा कामाला सुरुवात झाली आहे. बैलांची आवश्यकता असल्याने शेतकरी बाजारात चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे. मात्र जनावरांचे भाव वधारल्याने अनेकांचा नाईलाज होत आहे. बैलांच्या किंमतीत तीन ते सात हजारापर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यातही नामवंत जातीचे बैल मिळणे कठीण झाले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतमालाचे भाव गडगडले आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दर दुपटीने वाढले आहे. खते, किटकनाशके आणि बियाण्यांचे दरही वाढत आहे. यंत्राने मशागत करावी लागत असल्याने त्यासाठीही रोख रक्कम मोजावी लागते. पैशासाठी शेतकरी बँकाच्या दारात उभा आहे. अशा स्थितीत बाजारात बैलांचे दर वधारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

व्यापाऱ्यांच्या दुष्टचक्रात फटका
देव्हाडा बैलबाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट दिसत आहे. सध्या शेतकरी बैल खरेदीसाठी बाजारात येत असल्याने व्यापाऱ्यांनी जनावरांचे भाव वाढविले आहे. शेतकरी आपले जनावरे विकण्यासाठी बाजारात नेतो तेव्हा भाव पडलेले असतात आणि खरेदीसाठी जातात तेव्हा भाव वधारलेले दिसतात. व्यापाऱ्यांच्या या खेळीने शेतकरी अडचणीत येत आहेत.

Web Title: In Kharipa's mouth, the prices of animals rose in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार