खुटसावरीवासीयांची धूरमुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:28 PM2018-04-15T23:28:48+5:302018-04-15T23:28:48+5:30
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जंगल तोड करुन सरपणासाठी जाण्याची वेळ महिलांवर येवू नये. त्यांची पायपीट होऊ नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी भंडारा तालुक्यातील खुटसावरी वासीयांनी गाव धूरमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ध्येय पुर्ततेसाठी गॅस कंपनीचे अधिकारी, गॅस एंजसीचे वितरक, कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.
महिलांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जावे लागते. महिलांच्या जीवनात आत्मसन्मान जागविण्यासाठी विविध योजना आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस जोडणी योजना कार्यान्वित करण्यात आली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांची पायपीट होवू नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी गॅस जोडणी महत्वाची आहे. ज्या घरात गॅस जोडणी पूर्वीच देण्यात आली, त्या घरी दुसºयांदा गॅस जोडणी देण्याचे कटाक्षाने टाळून गरजूनाच लाभ देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खुटसावरी गावाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत निवड करण्यात आली आहे. या गावाची लोकसंख्या हजाराच्यावर आहे. मात्र गावात केवळ ८४ कुटूंबांकडे गॅस जोडणी आहे.
गावातील प्रत्येक कुटूंबाकडे गॅस जोडणी व्हावी, असा उद्देश शासनाचा आहे. धूर मुक्तीतून महिलांची सुटका व्हावी, याकरीता रविवारला गावात धावपळ दिसून आली. गावातील १० सुशिक्षिीत बेरोजगारांचा एक गट तयार करुन त्या गटांनी गावातील सर्व्हे केला. गाव धूर मुक्त करण्यासाठी आज सकाळपासून गावात अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ एकत्रीत आले होते. ग्रास्थांच्या शंकाकुशंकावर त्या अधिकाऱ्यांनी निसंकोचपणे उत्तरे दिलीत.
ग्रामपंचायत पदाधिकारी सरसावले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत खुटसावरी गावाची निवड करण्यात आली आहे. त्या निमित्ताने आखून दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी कंबर कसली आहे. गावात जनजागृती करुन शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याकामी खुटसावरीचे सरपंच विजय वासनिक, उपसरपंच सुरेश उईके, ग्रामसेवक एस.एस. हातझाडे, सदस्य छाया वाहणे, प्रियंका टेंभूर्णे, ममिता हारगुळे, सरीता मडावी, डाटा आॅपरेटर विनोद पोटवार, रोजगार सेवक कुणाल गेडाम, शिपाई रुस्तम टेंभूर्णे यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्नरत आहेत.
ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावातील गरजू महिलांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उज्ज्वला योजनेतंर्गत केवळ १०० रुपयांमध्ये गॅस जोडणी देऊन धूरमुक्त गाव करण्याचा मानस आहे. त्याकरीता गावाला भेट देऊन जनजागृती करण्यात आली. उज्ज्वला योजनेसाठी सात प्रवर्ग निर्धारीत केलेले आहेत. त्यानुसार लागण्यात येणाºया कागदपत्रांची पुर्तता होताच गावात लवकरच गॅस जोडणीचे वितरण करण्यात येईल.
- डी.एफ.कोचे,
संचालक, कोचे गॅस सर्व्हीस भंडारा.