पाण्याच्या शोधात काळवीटचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:09 AM2018-04-10T00:09:27+5:302018-04-10T00:09:27+5:30
उन्हाळा चांगलाच तापत असून याचा परिणाम मानवी जीवनासह वन्यप्राण्यांवरही होत आहे. जंगलातील पानवटे कोरडे पडू लागल्यामुळे पाण्याच्या शोधात असलेल्या एका काळवीटचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : उन्हाळा चांगलाच तापत असून याचा परिणाम मानवी जीवनासह वन्यप्राण्यांवरही होत आहे. जंगलातील पानवटे कोरडे पडू लागल्यामुळे पाण्याच्या शोधात असलेल्या एका काळवीटचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील नेरी लगत असलेल्या सुरनदीच्या पात्रात हा काळवीट मृतावस्थेत आढळून आल्याचे दिसून आला. ही घटना लक्षात येताच नेरीचे सरपंच आनंद मलेवार व ग्रामपंचायत कर्मचारी योगेश्वर वैद्य यांनी कांद्रीचे वनपरिक्षेत्राधिकारी डी.पी. चकोले यांना सुचना दिली.
त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांनी मृतक काळवीटचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजय लांजेवार, पोलीस पाटील योगेश्वर माकडे, वनरक्षक राकेश किरणापुरे, बीटरक्षक अर्चना किरणापुरे, एस.जी. बुंदेले, बी.एन. माकडे, देवानंद पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते.