लालपरीत पुन्हा खटखट; तिकिट मशीन नादुरुस्त, गणित करताना वाहक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:08+5:302021-07-29T04:35:08+5:30
कंपनीची सर्व्हीस मिळेना भंडारा विभागातील नादुरुस्त झालेल्या इटीएम मशीन दुरुस्तीसाठी ट्रायमॅक्स कंपनीकडे पाठविण्यात येतात. परंतु त्या वेळेवर दुरुस्तच होऊन ...
कंपनीची सर्व्हीस मिळेना
भंडारा विभागातील नादुरुस्त झालेल्या इटीएम मशीन दुरुस्तीसाठी ट्रायमॅक्स कंपनीकडे पाठविण्यात येतात. परंतु त्या वेळेवर दुरुस्तच होऊन येत नाही. त्यांची योग्य सर्व्हीस नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे वाहक मशीन बिघडवितात असा आरोप कंपनी करते. बंदच्या काळात योग्य चार्जींग केल्यानंतरही मशीनमध्ये बिघाड कायम आहे.
पगार मिळतोय हेच नशीब
कोरोना संकटाच्या काळात एसटीची चाके थांबली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट आली होती. वेळेवर पगार मिळणेही कठीण झाले होते. परंतु दुसऱ्या लाटेनंतर आता काही प्रमाणात एसटी सुरु झाली आणि पगारही वेळेवर मिळत आहे.
जुन्या जाणत्या वाहकांनाच ट्रे
अलीकडे वाहक म्हणून रुजू झालेल्या तरुणांना स्ट्रे मधून तिकीट देताना मोठी अडचण येत आहे. एका बटणावर तिकीट देण्याची सवय पडलेल्या या चालकांची ट्रे हातात आल्यावर मोठी धांदल उडते. त्यासाठी एसटी महामंडळाने आता जुन्या जाणत्या वाहकांनाच ट्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.