जाणून घ्या रानभाज्या खाण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:24 PM2024-07-05T14:24:33+5:302024-07-05T14:25:04+5:30
Bhandara : तुम्ही ह्या रानभाज्या खाल्ल्या का?
भंडारा : रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. दिवसेंदिवस शेतातून रानभाज्या नामशेष होत असल्या तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. वासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर गरजेचा आहे.
रानभाज्या खा, ठणठणीत राहा!
तांदुळजा :
■ निरोगी आणि आरोग्याला पोषक सर्व घटक मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे गरजेचे आहे. रानभाज्या खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला पोषक घटक मिळतात. रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा, असे बोलले जाते.
■ तांदुळजा ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे. शरीराला 'सी' जीवनसत्त्व मिळावे म्हणून तांदुळजाची भाजी खावी, असे सांगितले जाते. जर कोणाला गोवर, कांजण्या आल्या किंवा खूप ताप आला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा उपयुक्त ठरते.
अंबाडी :
■ अंबाडीच्या भाजीत कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व 'अ' 'क' अशा पोषक घटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत आहे.
■ उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिडच्या उपलब्धतेमुळे रक्तवर्धन होते. डोळे, केस, हाडांसाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी ही भाजी उपयुक्त आहे.
माठाची भाजी :
■ थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखविण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठला ही म्हणतात.
पाथरी :
■ ही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होते. खाण्यासाठी थंड असते. पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे.
रानभाज्यांसह इतर पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक असतात. जीवनसत्त्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात पालेभाज्यांसह रानभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. - डॉ विश्वनाथ नागदेवे, आहारतज्ज्ञा, भंडारा
पाऊस वेळेवर, रानभाज्या मिळतील खायला
यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा आल्याने आपल्या शेतात दुर्मीळ असलेल्या व आपल्या नजरेस न पडणाऱ्या पण आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या
रानभाज्या खायला मिळणार आहेत.