कोसराची सरपंच निवडणूक गुप्त पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:05 AM2021-02-18T05:05:42+5:302021-02-18T05:05:42+5:30

कोसरा येथे १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरपंच ,उपसरपंच निवडीसाठी सभा निवडणूक अधिकारी पानसे यांनी घेतली. त्यामध्ये काही ...

Kosra's Sarpanch election by secret ballot | कोसराची सरपंच निवडणूक गुप्त पद्धतीने

कोसराची सरपंच निवडणूक गुप्त पद्धतीने

Next

कोसरा येथे १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरपंच ,उपसरपंच निवडीसाठी सभा निवडणूक अधिकारी पानसे यांनी घेतली. त्यामध्ये काही सदस्य हात वर करून सरपंच निवडावे, तर मी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली, यामध्ये बराच वेळ लागला. नायब तहसीलदार चौधरी यांनीदेखील ग्रामपंचायत सभेत आल्यानंतर समजावून सांगितले की, एखाद्या सदस्याने गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केल्यास ते घेणे बंधनकारक आहे म्हणून सरपंच पदासाठी गुप्त मतदान घेतले. त्यामध्ये सुरेश कुर्झेकर यांना ६ मते मिळाली, तर सीता रामभाऊ नांदेकर यांना ५ मते मिळाली म्हणून सरपंच म्हणून निवडणूक अधिकारी यांनी सरपंच म्हणून मला घोषित केले. काही लोकांनी हात वर करून प्रथम सरपंच निवड झाली, असे जे गावकरी लोकात माहिती दिली ती बरोबर नाही, सरपंच गुप्त मतदान पद्धतीने निवडले, तसेच उपसरपंच ललिता सचिन उपरिकर यांची निवडदेखील गुप्त मतदानाने झाल्याचे सांगितले.

Web Title: Kosra's Sarpanch election by secret ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.