स्कायवर्डस शाळेत कोविड जागरूकता कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:39 AM2021-01-16T04:39:17+5:302021-01-16T04:39:17+5:30
लाखनीः तालुक्यात पिंपळगाव येथील स्कायवर्डस स्कूलमध्ये जागृतता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक म्हणून डॉ. चंद्रकांत ...
लाखनीः तालुक्यात पिंपळगाव येथील स्कायवर्डस स्कूलमध्ये जागृतता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक म्हणून डॉ. चंद्रकांत निंबार्ते उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शकाच्या रूपाने बोलताना डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांनी विद्यार्थ्यांना कोविड १९ ची लक्षणे ,खबरदारी, रोग प्रतिकार क्षमता, उपाययोजना व सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या कोविड विषयीच्या शंका डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्यासमोर मांडल्या आणि मार्गदर्शकांनी शंकांचे निरासन केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका दया राऊत, उपमुख्याध्यापिका स्वेता मुंडे, प्रशासक गिरीश बावनकुळे आणि देविदास आखरे, मृणालिनी माटे, हेमलता गणवीर, जयंत खोब्रागडे इत्यादी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे संचालक डॉ. नीरज कटकवार,डाॅ. पंकज कटकवार ,डॉ. विलास बुलकुंडे, डॉ. सोनाली कांकडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल कौतुक केले.