शिक्षक बनले कोविड लसीकरणाचे 'डाटा एन्ट्री ऑॅपरेटर '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:33+5:302021-04-30T04:44:33+5:30
लाखनी : कोरोनाच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका स्तरावर कोविडत्र१९ आजाराच्या निदानाकरिता चाचण्या केल्या जात आहेत. सर्व ...
लाखनी : कोरोनाच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका स्तरावर कोविडत्र१९ आजाराच्या निदानाकरिता चाचण्या केल्या जात आहेत. सर्व लसीकरण व चाचण्यांची नोंद ऑनलाईन पोर्टलवर डाटा एन्ट्री करण्यात येत आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटरची निवड लक्षात घेऊन लाखनीचे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी जिल्हा परिषद व खासगी शाळेतील ६९ शिक्षकांना डाटा एन्ट्रीचे काम सोपविले आहे.
डाटा एन्ट्रीकरिता शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर काही शिक्षकांत नाराजीचा सूर होता. परंतु लसीकरणाची मोहीम कमीत कमी अवधीमध्ये पूर्ण करण्यात यावी यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे नियुक्त कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे . तालुक्यातील लसीकरण केंद्रात लाखनी येथील ग्रामीण रुग्णालय, पालांदूर (चौ.) येथील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी (तुपकर), पोहरा, सालेभाटा, केसलवाडा (वाघ), पिंपळगाव (सडक) या ठिकाणी तसेच उपकेंद्र पातळीवरील दिघोरी,चान्ना,जेवनाळा, मचारना, सामेवाडा, राजेगाव, लाखोरी, गडेगाव, मर्हेगाव, सेलोटी, मानेगाव (सडक), मासलमेटा, भुगांव, रेंगेपार(कोहळी), परसोडी, विहीरगाव, मांगली, मोगरा, रेंगेपार (कोठा) येथे ३० एप्रिलपर्यंत २२ पथकांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १ पथक राखीव ठेवण्यात आले आहे .
बॉक्स
ग्रामपंचायतद्वारे जनजागृती सुरू
कोविड लसीकरण मोहीम यशस्वी व्हावे यासाठी गाव पातळीवर आरोग्य विभागाद्वारे व ग्रामपंचायतद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक व ४५ च्या वरील वयोगटातील व्यक्तींना ३० एप्रिल पर्यंत लसीकरणाचे पूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. १ मे पासून १८ वर्षावरील वयोगटातील तरुणांना लसीकरण करण्यात येणार आहे.
बॉक्स
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
कोविड लसीकरणानंतर काही व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेतली नसल्याने व विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने निधन झाले. यामुळे लसीकरणाविषयी गैरसमज निर्माण झाले होते. ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने लोकांचा गैरसमज दूर करून लसीकरणास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अशीही मागणी होत आहे.