आदिवासी मुलींच्या वसतिगृहात ४० खाटांचे कोविड केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:52+5:302021-04-21T04:34:52+5:30
करण्याची तयारी तुमसर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत तुमसर तालुक्यात रुग्णवाढ सतत होत आहे. संक्रमितांच्या संख्येवरून ते दिसून येते ...
करण्याची तयारी
तुमसर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत तुमसर तालुक्यात रुग्णवाढ सतत होत आहे. संक्रमितांच्या संख्येवरून ते दिसून येते त्यात शहरातील शासकीय तथा खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येच्या तुलनेत सध्या बेडची कमतरता आहे. ही बाब आमदार राजू कारेमोरे यांनी हेरली. त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाला कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. सदर अस्थायी कोविड सेंटरमध्ये ४० बेडच्या क्षमतेचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये येत्या एक-दोन दिवसांत बेडची क्षमता दुप्पट करण्यात येणार आहे.
सदर सेंटरमध्ये सध्या २० ते २५ संक्रमितांवर उपचार सुरू आहे.
तुमसर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून, त्यात मृत्यूचे तांडवही भयावह आहे. उपचारार्थ वेळेत कुणाला रुग्णालयात बेड नाही, तर कुठे प्राणवायूसह रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तालुक्यातील स्थानिक संक्रमितांना जिल्हास्तरावर पाठविण्यापेक्षा शहरात उपचारावर भर देण्याचा निश्चय आमदार कारेमोरे यांनी केला. त्यातून प्र. कोविड सेंटर तयारी सुरू झाली. सदर सेंटरची सध्या क्षमता ४० बेडची असून ती येत्या काही दिवसात दुप्पट केली जाणार आहे. त्यात सदर सेंटरमध्ये कोरोनाच्या पहिल्या स्टेजच्या संक्रमितांना उपचार मिळणार आहे. मात्र रुग्णांची स्थिती पाहता सेंटरमध्ये दररोज दुसऱ्या व तिसऱ्या स्टेजचे संक्रमित दाखल होत आहेत.
पहिल्या स्टेजचे संक्रमित रुग्ण सध्या त्या सेंटरमध्ये नाही. संक्रमितांची स्थिती लक्षात घेता तेथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर आपात्कालीन सुविधांचा पुरवठा करून सेंटरची रुग्ण हाताळणीची गुणवत्ता वाढविली जाणार आहे. सेंटरमध्ये वैद्यकीय चमू तैनातीवर असून पाळी-पाळीने तज्ज्ञ डाॅक्टरांची चमू येथे कार्यरत केली जात आहे. सध्या क्षमता वाढीसह गुणवत्ता वाढीवरही तितकाच भर दिला जात आहे.
दुसऱ्या स्टेजच्या संक्रमितांकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची तर तिसऱ्या स्टेजकरिता जिल्हास्तरीय रुग्णालयाची नेमणूक प्रोटोकाॅलनुसार केली गेलेली आहे. मात्र संक्रमणाची टक्केवारी लक्षात घेता तुमसर तालुक्यात दुसऱ्या व तिसऱ्या स्टेजचे संक्रमित रुग्ण आढळण्याचा दर जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे. येथे कोविड सेंटरला गुणवत्तापूर्व साहित्यांचा पुरवठा करून दिला जाणार आहे.
पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजचे संक्रमण: सध्या तालुक्यात कोरोना संक्रमणाची धास्ती व त्याआनुषंगाने चाचणीपूर्व सिटीस्कॅनवर भर दिले जात आहे. मात्र अचूक रोगनिदान करण्याकरिता सिटीस्कॅन करण्यात येत आहे. अती सौम्य लक्षणे असलेल्यांना पहिल्या तर सौम्य संक्रमितांना दुसऱ्या, तर तीव्र लक्षणासह त्यांना तत्काळ प्राणवायूसह महत्त्वाच्या इंजेक्शनची गरज भासते त्यांना तिसऱ्या स्टेजचे संक्रमण संबोधले जाते. तुमसर तालुक्यात सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.