निर्माणाधीन इमारतीवरून पडून मजूर ठार, देव्हाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:25 IST2021-11-18T15:23:51+5:302021-11-18T15:25:13+5:30
इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅबवरून मजूर लक्ष्मण बुराडे खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

निर्माणाधीन इमारतीवरून पडून मजूर ठार, देव्हाडी येथील घटना
भंडारा : एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून एक बांधकाम मजूर ठार झाला. ही घटना तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गवरील देव्हाडी येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. तुमसर येथे उपचारादरम्यान सदर मजुराचा मृत्यू झाला.
लक्ष्मण बुराडे(४०), रा. खापा ( तुमसर) असे मृताचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग जवळ केशव दमाहे यांच्या इमारतीचे बांधकाम भोयर नामक कंत्राटदार करीत आहे. इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅब वरून मजूर लक्ष्मण बुराडे खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी देव्हाडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक टी. टी. गभने करीत आहेत.