शालेय वेळेवर बस फेरींचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 10:19 PM2019-08-02T22:19:22+5:302019-08-02T22:19:51+5:30
शालेय सत्र सुरु झाल्यापासून भंडारा- जवाहरनगर या मार्गावर सकाळी व दुपारच्या सत्रात सुरु असलेल्या दोन बस बंद केल्या आहेत. आगार प्रशासनाने सदर बंद बस फेरी पुर्ववत सुरु करण्याची मागणी पालक वर्गाने संबंधीत प्रशासनाकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : शालेय सत्र सुरु झाल्यापासून भंडारा- जवाहरनगर या मार्गावर सकाळी व दुपारच्या सत्रात सुरु असलेल्या दोन बस बंद केल्या आहेत. आगार प्रशासनाने सदर बंद बस फेरी पुर्ववत सुरु करण्याची मागणी पालक वर्गाने संबंधीत प्रशासनाकडे केली. मात्र याकडे आगार प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. बस सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनने दिला आहे.
भंडारा - जवाहरनगर दरम्यान प्रवास करणाºयांची संख्या अधिक आहे. यात आयुध निर्माणी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, खासगी कामगार यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांना व कर्मचाºयांना आपल्या कर्तव्यावर वेळेवर पोहचणे गरजेचे असताना एसटीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य व कर्मचाºयांना प्रशासन घरी परत पाठवितात. यामुळे बºयाच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे व कर्मचाºयांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. पालक वर्ग व संबंधितांनी बस आगार प्रशासनाकडे सकाळ सत्रात अर्थात ७ व ७.३० वाजताची ठाणा- शहापूर येथे पोहचणारी व दुपारला २.३० व ३ वाजताची बंद करण्यात आलेली बस सुरु करण्याची मागणी केली. मात्र याकडे आगार प्रशासनाने दुर्लक्ष केले.
सकाळी ७.१५ वाजताची सुरु असलेली पिपरी बस ठाणा-जवाहरनगर येथे ८ वाजता दरम्यान येते. शालेय विद्यार्थ्यांची शाळेत दाखल होण्याची वेळ ७.३० वाजताची व कर्मचारी यांची वेळ तीच आहे. या मार्गावर नानाजी जोशी विद्यालय, आयुध निर्माणी केंद्रीय व फॅक्ट्री स्कूल, ग्रामविकास हायस्कूल, मानवता शाळा, कला वाणिज्य पदवी महाविद्यालय, ओमसत्यसाई कला विज्ञान महाविद्यालय व आयुध निर्माणी भंडारा आहे. येथील एसटी पासधारक कर्मचारी, विद्यार्थी व खासगी कामावर ये-जा करणाºया कामगारांना बस फेरी बंद केल्यामुळे सकाळची ठाणा येथे पोहोचणारी ७ व ७.३० वाजताची तसेच दुपारी २ व २.३० वाजता जवाहरनगरहून सुटणारी भंडारा- जवाहरनगर बसपुर्ववत सुरु करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा भंडारा विधानसभा प्रमुख यशवंत वंजारी यांनी निवेदनातून दिला आहे.