प्रशासकीय इमारतीत सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:07 PM2018-01-01T23:07:23+5:302018-01-01T23:07:44+5:30
येथील प्रशासकीय इमारतीत सोयीसुविधांचा अभाव असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : येथील प्रशासकीय इमारतीत सोयीसुविधांचा अभाव असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोयीसुविधा पुरविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
निवेदनानुसार, नवीन प्रशासकीय इमारतीचे माहे मार्च-एप्रिल २०१६ च्या दरम्यान रंगकाम करण्यात आलेले आहे. या कामातंर्गत प्रशासकीय ईमारतीला दाराच्या बाजुला, समोरील भागास फक्त रंगकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या खाली असलेला पोर्च, इमारतीमधील पोर्च व तसेच इमारतीचा बाहेरील सुटलेला काही भाग इत्यादीचे रंगकाम करण्यात आले ेनाही. तथापि इमारती मधील कक्ष क ३ व ४ ला आतून रंगकाम करण्यात आलेले आहे. परंतु कक्ष क्र. १ व २ चे अद्याप पर्यंत आतील रंगकाम करण्यात आलेले नाही.
त्याच इमारतीमध्ये उपप्रादेशिक परविहन कार्यालय, सेतु केंद्र व जिल्हा उद्योग कार्यालय इत्यादी कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे येणे जाणे सुरू असते. त्यांना प्रसाधनगृह व शौचालय आदीची व्यवस्था नसल्याने परिसरात कुठेही या विधी उरकल्या जातात. त्यामुळ या परिसरात घाण पसरलेली आहे. चारही बाजुने दुर्गंध येत असतो. त्यामुळे इमारतीमधील कर्मचाऱ्यांना व परिसरातील इतर नागरिकांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासकीय इमारत परिसरात प्रसाधनगृह, शौचालयाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सेतु कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी योजनाबद्ध पार्किंगची व्यवस्था या इमारतीमध्ये उपलबध होणे गरजेचे आहे. यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष एस.बी. भोयर, विशाल तायडे, सहकोषाध्यक्ष, सुनिल थोटे, प्रशांत जडताळे, शिव साहेब उपस्थित होते.