निधीअभावी भटक्या जाती-जमातीच्या वसाहतीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:11+5:302021-02-15T04:31:11+5:30

चुल्हाड ( सिहोरा ) : राज्यातील आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील भटक्या जाती- जमातीच्या वसाहतीचे निधीअभावी स्वप्न भंगले ...

Lack of funds shattered the dream of colonization of nomadic castes and tribes | निधीअभावी भटक्या जाती-जमातीच्या वसाहतीचे स्वप्न भंगले

निधीअभावी भटक्या जाती-जमातीच्या वसाहतीचे स्वप्न भंगले

Next

चुल्हाड ( सिहोरा ) : राज्यातील आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील भटक्या जाती- जमातीच्या वसाहतीचे निधीअभावी स्वप्न भंगले असल्याचा आरोप भटक्या जाती- जमाती संघर्ष कृती समिती, तुमसर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील भटके विमुक्त जाती- जमाती एनटीबी तथा धनगर समाज घरकुल योजना समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे बॅनर लावून प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून भिंतीपुरतेच शोभेची ठेवले. मात्र, या बॅनरमध्ये भटक्या विमुक्त जाती- जमाती घरकुल योजनेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तीन वर्षांपासून भटक्या विमुक्त जाती-जमाती घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे धूळखात पडून आहेत.

भंडारा जिल्ह्यातील भटक्या समाजाचा महाविकास आघाडी सरकारवर रोष व्यक्त होत आहे. भटक्या विमुक्त वंचित घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना राबविणुयाबाबत पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी ३१ ऑगस्टच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन करा, विजाभज इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय अनुषंगाने विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना राबविण्याबाबत लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेच्या ठरावाऐवजी ग्रामपंचायत मासिक सभेच्या ठरावासह परिपूर्ण प्रस्ताव १५ सप्टेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समीतीच्या मंजुरीकरिता जिल्हा व तालुक्यांतील घरकुलाच्या याद्या सज्ज असताना व भटक्या जाती-जमाती विमुक्तांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, प्रश्न कायमच आहे. महाआवास अभियान सर्वांना घर असले तरी स्वातंत्र्यकाळापासून भटक्या विमुक्त जाती- जमाती वंचित घटक घरकुल योजसाठी आजही वंचितच असल्याचे सांगितले जात आहे.

२४ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकात देश स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटूनही अद्यापही भटक्या समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी, उत्पन्नस्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे त्यामुळे भटक्या जाती- जमाती विमुक्त जाती मूळ योजनेत सुधारणा करुन सदर योजना राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेच्या धर्तीवर, पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात यावा.

महाआवास अभियान ग्रामीण १०० दिवस घरकुल स्वप्नपूर्तीचे असले तरी महाराष्ट्र राज्य सरकार परिपत्रक संदर्भीय अनुषंगाने भटक्या विमुक्तांचे घरकुलाचे स्वप्न भंग केले, असा आरोप एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक जनार्दन खेडकर, धनगर कृती समिती भंडारा जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, भारतीय मच्छीमार समाज संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष सुनिता मोहनकर, माजी उपसरपंच मुनिराज मारबदे, एकलव्य सेना तुमसर तालुका मुख्य संघटक गणेश मेश्राम, एकलव्य सेना उपसंघटक, संघाटक दीपक मारबदे, संजु भुरे, संदीप मारबदे, मनोज केवट व जिल्ह्यातील भटक्या समाजाला भेडसावत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Lack of funds shattered the dream of colonization of nomadic castes and tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.