पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 12:25 AM2016-11-13T00:25:43+5:302016-11-13T00:25:43+5:30
झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा नावारुपास आला आहे.
भंडारा : झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा नावारुपास आला आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, दनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणारे झरे, भव्य निसर्गरम्य जलाशय, वन्यप्राणी व वनस्पतीची मुबलकता भंडारा जिल्ह्याचे वैभव ठरते. मात्र, तब्बल १२ वर्षांपासून या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी नाही. निधीअभावी या जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे.
झाडीपट्टीचा श्रीमंत असलेला जिल्हा पर्यटनस्थळांच्या बाबतीत उदासीन ठरला आहे. मराठीचे आद्यकवी मुवुंष्ठद राज, महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींची पावनभूमी, महाकवी नाटककार भवभूतींचा जन्म आणि कमर्भूमी सम्राट अशोक, राजा बख्तबुलंद शाह, राजे रघुजी भोसले, पवनराजा यासारख्य शूरविरांचा शौर्य पराक्रम व महान कार्याचा गुणगौरव करणारा भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आणि तांदळाची बाजारपेठ म्हणून भंडारा जिल्ह्याला गौरविण्यात येते.
१९९९ ला भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला. या दोन्ही जिल्ह्यात भरपूर पर्यटनस्थळे आहेत. १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याच्या विभाजनानंतर या जिल्ह्याच्या वाट्याला जी पर्यटनस्थळे आली ती आजतागायत शाबूत आहेत. मात्र, त्यांचा विकास होऊ शकला नाही. जिल्ह्यात एकुण ३२ ‘क’ श्रेणी पर्यटनस्थळे आहेत. परंतु विकासाचा महामेरु व जिल्ह्याचे एकमेव भूमिपूत्र म्हणवणाऱ्या येथील नेत्यांनी या पर्यटनस्थळांकडेच पाठ फिरविली आहे.
भंडारा जिल्ह्यातील संस्कृती दर्शविणाऱ्या अनेक प्राचीन वास्तू, पवित्र धार्मिक ऐतिहासिक, पुरातात्विक महत्त्वाची स्थळे आजही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. नागपूरचे राजे बख्त बुलंदशाहाद्वारे निमिर्ती कलात्मक वास्तुशिल्पांचे सुंदर दर्शन घडविणारा आंबागड किल्ला (तुमसर), भंडारा येथील १५० वर्षापूर्वीचा पांडे महल, सानगडी (साकोली) येथील पुरातन सहानगड, प्राचीन मंदिराची नगरी, राजा कुशान, सम्राट अशोक यांच्या साम्राज्यात समृद्ध व विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी पवनी नगरी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच धार्मिक व श्रद्धास्थान गायमुख, चांदपूर (तुमसर), रावणवाडी जलाशय (भंडारा), सिरेगावबांध, शिवनीबांध, गडकुंभली, दुर्गाबाई डोह (साकोली), चकरा (अड्याळ), लाखा पाटलाची टेकडी (कोका जंगल), चप्राड पहाडी (लाखांदूर), दशबल पहाडी, झिरी, शंकर महादेव (नेरला), सोनी नदी संग, गिरोला टेकडी, भृशुंड गणेश मंदिर, गुढरी जलाशय, मांगलीबांध, उत्तरवाहीनी (मांडळ) महास्तूप सिंदपुरी (पवनी), शिवपावर्तीची गुफा (धुटेरा-तुमसर), हनुमान देवस्थान खोडगाव, चंडिका माता मंदिर (मोहाडी), गोसेखुर्द धरण (पवनी) यासारख्या अनेक पर्यटन व धार्मिक स्थळांची यशोगाथा वर्णन करणारी ही ठिकाणे आहेत. परंतु नावाचाच श्रीमंत असणाऱ्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे मात्र अस्तित्वाची लढाई लढत आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेला जिल्हा पर्यटन स्थळांच्या विकासाच्या बाबतीत मात्र शापित ठरलेला आहे. (शहर प्रतिनिधी)