परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी

By admin | Published: October 3, 2016 12:28 AM2016-10-03T00:28:11+5:302016-10-03T00:28:11+5:30

परतीच्या पावसाचा तडाखा सुरु असल्याने हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.

Lack of lightning after returning rain | परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी

परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी

Next

उत्पादनावर परिणाम : २० टक्के क्षेत्र पडीत, पाऊस तारणार की मारणार?
भंडारा : परतीच्या पावसाचा तडाखा सुरु असल्याने हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याचा उत्पन्नावर परिणाम होत असून शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने नुकतीच घोषित केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे काढली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिन्यात उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुरुवात केली. मात्र हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आहे.
पालांदूर : धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्याला मागील १५ दिवसापासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व मध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी धान सडत आहे. काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोतामुळे धानपिक भुईसपाट झाले आहे. सततच्या पावसाने बांध्यातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाला सडका वास येत आहे. शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मागील ३ वर्षाचा ओला आणि कोरडा दुष्काळ डोक्यावर घेत हिमतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होतो. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पावसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली. जुलै महिन्यात समाधानकारक पण ‘कही खुशी कही गम’ करीत हजेरी लावली. धान कमी पण निंदण जास्त अशी स्थिती संप्टेंबर महिन्याच्या पहिला व दुसऱ्या हप्त्यात पाहायला मिळाली. महिन्याअखेरपर्यंत पावसाची जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी कसा जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात. ही नियमित करुन खर्च कमी करण्याची आवश्यक आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरश: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नविन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.
तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धान शेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांध्यातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठअंर्गत साकोली कार्यालयातून माहिती दिली जात आहे. (वार्ताहर)

यंदाही उत्पन्न बुडण्याची भीती
पालोरा (चौ.) : सध्याला हलके धानाचे पिक कापणीवर आले आहेत. मात्र पावसामुळे चौरास भागातील हलक्या धान पिकाची मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. येणाऱ्या पावसाने उच्च धान पिकाला फायदा होत असला तरी हलक्या प्रतीचे धान मातीमोल होत आहेत.
शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावल्यामुळे पीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पवनी तालुक्यातील पालोरा हा परिसर चौरास भाग म्हणून प्रसिद्ध आहे. धान पिक हा शेतकऱ्यांचा मुख्य पीक आहे. सतत शेतकरी दुष्काळाच्या छायेत जीवन कंठीत होता. यावर्षी वरूण राजाच्या कृपेने वेळोवेळी पावसाचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र धान पिक चांगल्या प्रमाणात असून यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दररोज कमी जास्त पाऊस येत असल्यामुळे हलके धान पिक धोक्यात आले आहे. अनेक शेतातील धान पडल्यामुळे मातीमोल झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Lack of lightning after returning rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.