मोबाईल नेटवर्कअभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:41 AM2021-02-20T05:41:02+5:302021-02-20T05:41:02+5:30

भंडारा : कोरोना संसर्गामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खाजगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरु झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही ...

Lack of mobile network | मोबाईल नेटवर्कअभावी

मोबाईल नेटवर्कअभावी

Next

भंडारा : कोरोना संसर्गामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खाजगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरु झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र भंडारा शहरातील खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तुलसी नगर, गंगानगर, न्यू शिवाजी, रजनी नगर, ग्रामसेवक कॉलनी, वैशाली नगर, केशव नगरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क अभावी गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. या परिसरात मागील दहा वर्षापासून नेटवर्कचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऐन कोरोना संकटात नागरिकांना घरबसल्या इंटरनेटवर काम करणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांना मोबाईलवरुन संवाद साधतांना देखील अनेकदा घरावर चढावे लागत आहे. दहा वर्षापासून परिसरातील नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कंपनीकडे वारंवार निवेदन दिले आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडथळे निर्माण होत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामे करण्यासाठी तगादा लावत आहेत.

Web Title: Lack of mobile network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.