वैयक्तिक लाभ योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:36 PM2018-03-26T23:36:04+5:302018-03-26T23:36:04+5:30

शेतकऱ्यांचे वैयक्तिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे आशेने बघितले जात असताना टेमनी गावात राखीव रेसोचे लचके तोडण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा प्रस्ताव असताना चक्क निधी मधून सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे.

Lack of personal benefits scheme | वैयक्तिक लाभ योजनेपासून वंचित

वैयक्तिक लाभ योजनेपासून वंचित

Next
ठळक मुद्देगोठ्यांचे बांधकाम अडले : सिमेंट रस्ता बांधकामाला मंजुरी, टेमनी येथील प्रकार

आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांचे वैयक्तिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे आशेने बघितले जात असताना टेमनी गावात राखीव रेसोचे लचके तोडण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा प्रस्ताव असताना चक्क निधी मधून सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या टेमनी गावात सन २०१६-१७ या सत्रात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा रेसो ७ लाखाचा निधी राखीव असल्याने गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माजी सरपंच सतीश चौधरी यांनी पंचायत समितीला प्रस्ताव दिला. यात शेतकरी गणेश कासीवार, रामदयाल तुरकर, संतोष रहांगडाले, चमरु शरणागत, मुलचंद राऊत, टेकचंद तुरकर, तुकाराम बोपचे या शेतकºयांना जनावराचे गोठा बांधकाम मंजूर करण्यासाठी अर्ज, अंदाजपत्रक तथा अन्य दस्तऐवज दिले. रेसो शिल्लक असल्याने वैयक्तिक लाभाचे योजनेत शेतकºयांची निवड करण्यात आली. या योजनेत शेतकºयांना विहिर, गोठे, शेळी तथा अन्य योजना दिल्या जात आहे. वैयक्तिक लाभ देण्यासाठी मुळ आणि पुरक प्रस्ताव सादर करण्यात आला असताना प्रस्तावाचे लचके तोडण्यात आले.
निधी रावीख असतांना शेतकऱ्यांचे प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे हक्काचे योजनेपासून शेतकरी वंचित झाले. दरम्यान, गावात या सत्रात योजनेअंतर्गत ७ लाखाचा रेसी असतांना श्मशानभुमी पर्यंत जाणारा १२ लाख रुपये खर्चाचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या सिमेंट रस्त्यात शेतकºयांचे हक्क दाबण्यात आले आहे. सिमेंट रस्ता निर्मितीकरिता अन्य योजना असतांना शेतकºयांना रेसीचा फायदा देण्यात आला नाही. पंचायत समिती स्तरावर रोहयो विभागात घोळ करण्यात आला आहे. टक्केवारी प्राप्त करतांना विस्तार अधिकारी यांनी गावातील शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचा आरोप आहे. या घोळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गावता शेतकरी करीत आहे.

वैयक्तीक लाभाचा प्रस्ताव असला तरी पुरक प्रस्ताव सिमेंट रस्ता मंजुरीचा आला आहे. यामुळे रसता मंजुर करण्यात आला आहे.
- यु. जी. कुथे,
विस्तार अधिकारी रोहयो पं.स. तुमसर
टक्केवारी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले असून ७ लाखांचा रेसो असतांना १२ लाखांचा सिमेंट रस्ता मंजुर झाला आहे. चौकशी झाली पाहिजे.
- सतिश चौधरी,
माजी सरपंच टेंमणी

Web Title: Lack of personal benefits scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.