पावसाचा अभाव, किडीचा प्रादुर्भाव
By admin | Published: September 13, 2015 12:36 AM2015-09-13T00:36:54+5:302015-09-13T00:36:54+5:30
पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
आसगाव (चौ.) : पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने व मेहनतीने १५० ते २०० रुपये मजुरी देवून मागेपुढे न पाहता मागील महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी इंजिन लावून जमेल त्या साधनाने शेतात पाणी सोडून मोठ्या मेहनतीने रोवणी केली.
शेतकरी हिरवीगार स्वप्न उराशी बाळगून असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे व वातावरणात उष्णता निर्माण झाल्यामुळे पिकाच्या वाढीचा जोर नाहीसा होत आहे. भातपिकावर व सोयाबीन पिकावर निरनिराळ्या प्रकारचे रोग येत आहेत.
करपा, कडा करपा, बेड्डी, खोडकिडा, मावा, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन या पिकांची वातावरण मोकळे असल्यामुळे जोमाने वाढ झाली होती. परंतु या पिकावर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी तसेच या पिकावर मर रोग आल्यामुळे झाडे आपोआपच पिवळी पडलेली आहेत. अशातच रासायनिक खते व औषधींच्या किमती वाढतच आहेत. कृषी पिकावर औषधी उपयोगी फवारणाऱ्या औषधांच्या महागड्या औषधी बाजारामध्ये येत आहेत. त्यामुळे शेतकरी भांबावल्या स्थितीतही महागडी किटकनाशके फवारणीसाठी कर्ज काढून, दागीने गहान ठेवून फवारणी व खतासाठी व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाट्टेल ते उपाय करत आहेत.
ऐन तोंडात अन्नाचा घास निसर्ग हिसकावून घेण्याचा परिस्थितीत उभा आहे. पिकावर अनेक प्रकारचे रोग आले असताना मात्र तालुका कृषी कार्यालयात कीड रोगावर प्रतिबंध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा औषध पुरवठा उपलब्ध नाही. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मदतही नाही. या अगोदरच्या सरकारच्या काळात मात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या किटकनाशकाचा पुरवठा अनुदानावर मिळत होता.
आता मात्र कृषी कार्यालय नावाचेच राहिलेले आहे. विद्युत मंडळ तारक की मारक या गंभीर परिस्थितीत विद्युत मंडळाचे पॉवर स्टेशन १३२ केव्ही पॉवरचे आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यात विहिरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे चौरास भाग म्हणून हमखास भातपिक देणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु दररोज शेतीला फक्त २४ तासापैकी १० तासच विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.त्यामुळे शेतकरी पुर्णत: हताश झाला आहे. (वार्ताहर)