अल्प बचत सर्वांसाठी जीवनभराचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 09:51 PM2017-09-25T21:51:13+5:302017-09-25T21:51:33+5:30

प्रत्येकाने जीवनात पैशाची बचत करावी. अल्प स्वरूपात केलेली बचत ही जीवनभराचा अमुल्य ठेवा ठरणार आहे.

Lack of savings should be lifelong for all | अल्प बचत सर्वांसाठी जीवनभराचा ठेवा

अल्प बचत सर्वांसाठी जीवनभराचा ठेवा

Next
ठळक मुद्देव्ही. एम. देशपांडे : न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था इमारतीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रत्येकाने जीवनात पैशाची बचत करावी. अल्प स्वरूपात केलेली बचत ही जीवनभराचा अमुल्य ठेवा ठरणार आहे. बचतीमुळे प्रत्येकांच्या जीवनाला शिस्तबद्धता येते. हीच बचत आयुष्याच्या कठीण प्रसंगी उपयोगात येणार असून प्रत्येकांनी कायद्याच्या चाकोरीत राहून काम करावे, असे प्रतिपादन नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी केले.
भंडारा जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारला पार पडले. यावेळी न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती एम.जी. गिरटकर तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा संजय देशमुख, भंडारा न्यायीक जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, भंडारा गोंदिया न्यायीक जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर यांनी उपस्थित पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना, अल्प भांडवलातून सुरु केलेल्या व आजपावेतो ४३९ सभासद असलेल्या संस्थेची स्वत:ची इमारत झाल्याबद्दल कौतूक केले व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी न्यायमूर्ती एम.जी. गिरटकर यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनीसुद्धा कर्मचारी यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त सभासद तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविणाºया पाल्यांचा न्यायमूर्ती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन बी.डी.कुलरकर व डब्लू.एल. कापगते यांनी केले. तर आभार एस.जी. कान्हे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष एस.डी. सपाटे, मानद सचिव डी.व्ही. देशमुख, उपाध्यक्ष पी.पी. पांडे व संचालक एस.जी. कान्हे, बी.डी. कुलरकर, डब्लू.एल. कापगते, जी.एस. साठवणे, एल.एम. पंचभाई, ए.ए. डोंगरे, एस.के. कवाने, डी.के. काटेकर, जी.एल. ढोरे, एस.बी. भिवगडे, व्ही.पी. बेदरकर, डब्लू.एच. रहिले तसेच न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Lack of savings should be lifelong for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.