ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

By admin | Published: April 19, 2015 12:35 AM2015-04-19T00:35:23+5:302015-04-19T00:35:23+5:30

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

Lack of solid waste in rural areas | ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

Next

गावात कचऱ्याचे ढिग : आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह
रंजित चिंचखेडे  चुल्हाड
भंडारा : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु स्वच्छ गावाच्या भूमिकेसाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हा पॅटर्न भंडारा जिल्ह्यात अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा उपक्रम राबविताना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
देशात स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाचा मोठा भर आहे. शहर आणि गावांना या अभियानात जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात गावकरी सहभाग घेत आहे. उपक्रमाचा अनुभव गावकऱ्यांना आहे. यामुळे गावात स्वच्छता दिसून येत आहे. या उपक्रम अंतर्गत गावात कचरा कुंडी तयार करण्यात आली आहेत. कचरा कुंड्या तुडूंब भरलेल्या आहेत. ग्रामपंचायतमार्फत कचराकुंडी स्वच्छ करण्यात येत असले तरी या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या शेजारी करताना दुर्गंधीची भिती निर्माण होत आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. या परिसरातील नाले हे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना जोडण्यात आली आहे. नाल्यात कचरा घातल्यास नद्यांचे पाणी आणि स्वच्छता दूषित होण्याची चिंता आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु बपेरा मार्गावर या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे तुमसरात दाखल होताना ये-जा करणाऱ्या नागरिकांचे स्वागत दुर्गंधीचे होत आहे. दरम्यान गावात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतांची निर्मिती करण्याचा पॅटर्न गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. २ ते ४ हजार लोकवस्तीच्या गावात घनकचरा वर्गिकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. गावाबाहेर शेड उभारण्यात आले असून विघटन आणि अविघटन असा कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. टाकावू कचऱ्यावर प्रक्रियेतून खत निर्मिती करण्याचा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

जीर्ण नालीमुळे घाणच घाण
गावात सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचे बांधकाम १० ते १५ वर्षापुर्वी करण्यात आली आहेत. घरांचे नव्याने बांधकाम होत असल्याने या नाल्याची दिशा बदलली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावताना या नाल्या असमर्थ ठरत आहे. गावातील संपूर्ण पाण्याची विल्हेवाट लावणारी प्रमुख नाली मोठ्या नाल्यांला जोडणारी नाही. यामुळे पाणी गावातच मुरत आहे तर पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे.

गावात कचऱ्यांची मोठी समस्या आहे. निधीअभावी स्वच्छता रखडली आहे. घनकचरा वर्गीकरण केंद्र प्रत्येक गावात निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल.
- छगनराव पारधी,
सरपंच धनेगाव.
गावातील कचऱ्यांची सातत्याने उचल करणारी साधने ग्रामपंचायतकडे नाहीत. यामुळे स्वच्छता प्रभावित होत आहे.
- नेहा पटले,
सदस्य ग्रामपंचायत चुल्हाड.

Web Title: Lack of solid waste in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.