अवजड वाहतुकीने उखडला लाखनीतील सर्व्हिस रोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:32 PM2019-07-16T23:32:44+5:302019-07-16T23:33:00+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहरातील वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू केल्यामुळे सर्व्हिस रोडची गिट्टीडांबर उखडले असून गिट्टी रस्त्यावर पसरल्याने नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावे लागत आहे.

Lacquer service road collapsed with heavy traffic | अवजड वाहतुकीने उखडला लाखनीतील सर्व्हिस रोड

अवजड वाहतुकीने उखडला लाखनीतील सर्व्हिस रोड

Next
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : धुळीमुळे आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहरातील वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू केल्यामुळे सर्व्हिस रोडची गिट्टीडांबर उखडले असून गिट्टी रस्त्यावर पसरल्याने नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावे लागत आहे.
लाखनी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण अशोक बिलकॉन कंपनीने पाच ते सहा वर्षापुर्वी केले होते. लाखनी शहरातील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता लाखनी शहरात उड्डानपुलाचे काम मंजुर झाले व गेल्या दहा महिन्यापासून फ्लॉय ओव्हरचे काम वेगाने जेएमसी कंस्ट्रक्शन कंपनीद्वारा सुरू आहे. मुख्य मार्गावर पिल्लर बनविण्याचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू केले. सदर मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ सुरू झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. डांबर उखडले आह ेतर कुठे रस्ता खाली बसला आहे. गिट्टी निघालेली असल्याचे दिसून येत आहे. सर्व्हिस रोडवरील वाहतुकीमुळे धुळीचे प्रमाण वाढले. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर पाणी टाकले जात नाही. पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
सर्व्हिस रोडने अनेक शालेय विद्यार्थी जाणे-येणे करतात. सर्व्हिस रोडवर वाहतूक सुरू झाली. परंतु सुरक्षितेची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात नाही. पोलीस विभागाद्वारे सर्व्हिस रोडवरील वाहने काही वेळ हटविले जातात. तुर्तास जेएमसी कंपनीला उखडलेला सर्व्हिस रोड दुरूस्त करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील धुळीचे लोट कमी करण्यासाठी उपाययोजना व रस्त्यावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे महत्वाचे आहे. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

Web Title: Lacquer service road collapsed with heavy traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.