धानोरी येथे तलाव स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:55 PM2019-03-20T21:55:42+5:302019-03-20T21:55:57+5:30
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्याने स्वच्छता ही मोहीम सुरु केली. या मोहिमेंंतर्गत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाकडून स्वच्छता पखवाडा १६ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विविध संस्थाकडून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जलस्त्रोत आणि त्यांना जवळच्या क्षेत्राची श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात यावी तसेच यासोेबत स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्याने स्वच्छता ही मोहीम सुरु केली. या मोहिमेंंतर्गत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाकडून स्वच्छता पखवाडा १६ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विविध संस्थाकडून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जलस्त्रोत आणि त्यांना जवळच्या क्षेत्राची श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात यावी तसेच यासोेबत स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. या माध्यमातून केंद्रीय जल आयोग, प्रबोधन मध्य संगठण नागपूर यांच्यामार्फत १९ मार्च रोजी मंगळवारला सकाळी८.३० वाजता तलाव स्वच्छता आणि ग्राम स्वच्छा व रॅली आयोजन ग्राम धानोरी येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, धानोरी आणि महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, धानोरी यातील विद्यार्थी, शिक्षक, सत्यसाई सेवा संगठण पवनी आणि समस्त धानोरी ग्रामवासीयांनी श्रमदान करुन सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला संबोधीत करताना प्रबोधन मध्य संगठन, नागपुरचे अधीक्षक अभियंता मिलिंद पानपाटील यांनी जल स्त्रोताच्या स्वच्छतेपासुन होणाऱ्या फायद्याच्या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात कार्यकारी अभियंता कैलाश लाखे यांनी जलसंवर्धनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. के. शुक्ला, अनुसंधान अधिकारी यांनी जलगुणवत्तेबाबद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ अभियंता पी. आर. ब्रम्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी केंद्रीय जल आयोग, प्रबोधन मध्य संगठन नागपुरच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरी मुख्याध्यापिका पी. ए. पारधी, एल एच. लांजेवार आणि धानोरी येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय मुख्याध्यापक अशोक पारधी, ग्राम धानोरी सरपंच नामदेवराव वाघधरे, सत्यसाई सेवा संगठन पवनी व समस्त विद्यार्थी, शिक्षक, ग्रामवासी यांनी उपक्रमासाठी प्रयत्न केले. आभार सहायक अभियंता बी. एम. बोरकर यांनी मानले.