जुलै महिन्याअखेरही तलाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:03 AM2019-07-29T01:03:02+5:302019-07-29T01:03:56+5:30

गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.

The lake is thirsty even after July | जुलै महिन्याअखेरही तलाव तहानलेलेच

जुलै महिन्याअखेरही तलाव तहानलेलेच

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा : रोवणीसाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात धावपळ

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.
नेरला उपसा सिंचनामुळे काही प्रमाणात बºयाच शेतकऱ्यांना लाभ झाला तर काहींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य म्हणजे रोवणीचा हंगाम जात असल्यामुळे शेतकरी लवकरात लवकर शेतातील रोवणी करायला गतीशील झाला असला तरी दुसरीकडे काही शेतकºयांची पºहे आधीच पावसाअभावी करपले. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागले. एकंदरीत काही पºहे कसेतरी जगले. मोठेही झाले. पण शेतात पाणीच नाही आणि शेतकºयांच्या शेतात पाणी आहे. त्याला वेळेवर मजूर मिळेना. काही शेतकºयांच्या मते आताची अडचण कशीबशी सुटली. परंतु खरी गरज पाण्याची पुढेही पडणार तेव्हा पाऊस पडला नाही तर मग उभे पीक करपण्याच्या आधी पाणी शेतीला मिळणे आवश्यक आहे.
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. कधी रोगराई तर कधी नापिकी. शेती नापिकीमुये शेतकºयांचे कुटुंब होत्याचे नव्हते झाले. उध्वस्त झाले पण शेतकºयाने आजही शेती सोडली नाही. सतत दोन दिवसात अड्याळ आणि परिसरात पाऊस पडला असला तरी तलावातील पाणी पाहून प्रत्येक शेतकºयाला मात्र आज विचार करायला भाग पाडले आहे. काही वर्षाआधीपावेतो अड्याळ व परिसरातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर तसेच जवळपास तलावात साचलेल्या पाण्यावर शेती अवलंबून राहाची. मात्र नेरला उपसा सिंचनावर सर्वच शेतकºयांची मोठी आशा दिसून येत असली तरी पाण्याच्या पातळीचे मुख्य कारण समोर येताना दिसते.
नेरला उपसा सिंचनाची गरज पुन्हा कोणत्याही क्षणी भासू शकते. ही शक्यताही नाकारता येणार नाही. असावेतीसाठी आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे राहील. ज्या शेतकºयांनी रोवणी केली आणि ज्यांची रोवणी बाकी आहे असे दोन्ही प्रकारच्या शेतकºयांमध्ये एकच धास्ती आजही आहे ती म्हणजे फक्त पाणी. काही जाणकारांच्या मते आज गावात आणि परिसरात पाण्याचे मोठमोठे तलाव यावेळी तुडूंब भरून दिसायचे. परंतु आज ती स्थिती नाही. त्यामुळे शेतीलाही पाणी जपून वापरणे ही सुद्धा काळाची गरज बनत चालली आहे.

पावसाच्या आगमनानंतरही रोवणी खोळंबलेलीच
पालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मोठ्या पावसाचा अंदाज जरी खोटा ठरला तरीपण सरीवर सरी दोन तीन दिवस कोसळल्यास रोवणीला न्याय मिळू शकते. शनिवारला केवळ रिपरिप होती. रविवारला सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला आहे. पालांदूरचे ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांच्या पुढाकारात तहसीलदार लाखनी यांना निवेदनातून नेरला लिफ्टचे पाणी सोडण्याचे कळविले होते. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. पालांदूर परिसरात पहाडी, देवरी, गोंदी येथील नाल्याला पाणी गोसेचे अडल्याने काहींनी रोवणीला आरंभ केला आहे. या नहराच्या पाण्याने भूजल पातळी वाढविण्याकरिता मोठी मदत होणार असून निकामी झालेली विहिर, बोअरवेल्स, फिल्टर पुन्हा नव्या जोमाने कामाला येतील यात शंका नाही. पावसाने सतत ठेवली तर नक्कीच सोमवारपासून रोवणीला गती येणार आहे. पालांदूर परिसरात २५ टक्के रोवणी आटोपली आहे. कोरडवाहूचा शेतकरी आकाशाकडे लक्ष वेधून आहे. मात्र पावसाची नियमितता महत्वाची ठरणार आहे.

Web Title: The lake is thirsty even after July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.