लाखांदूर नगरपंचायतीवर घरकुलासाठी महिलांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:53 PM2019-01-02T21:53:54+5:302019-01-02T21:54:12+5:30

घरकुलासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करीत लाभ देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी दुपारी लाखांदूर नगरपंचायतीवर धडक दिली. याठिकाणी ठिय्या देत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाची तारांबळ उडाली.

Lakhandur Nagar Panchayat is under attack for women | लाखांदूर नगरपंचायतीवर घरकुलासाठी महिलांची धडक

लाखांदूर नगरपंचायतीवर घरकुलासाठी महिलांची धडक

Next
ठळक मुद्देलाभार्थी : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : घरकुलासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करीत लाभ देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी दुपारी लाखांदूर नगरपंचायतीवर धडक दिली. याठिकाणी ठिय्या देत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाची तारांबळ उडाली.
लाखांदूर नगरपंचायत कार्यक्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन महिन्यांपूर्वी अर्ज भरुन घेण्यात आले. जंगली झुडप असलेला भाग आणि गाव नमुना आठ आहे, त्यांनाच अर्ज करता येईल असे अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यावरुन गावातील शेकडो लोकांनी अर्ज भरले. अनेकांनी दागदागिने जनावरे विकून गृहकर भरला. त्यानंतर म्हाडाच्या अधिकाºयांनी ज्यांचे पट्टे, आखीव पत्रिका आहेत अशानाच लाभ देण्यात येईल, असे सांगितले. यावरुन १७ डिसेंबर रोजी रत्नमाला गजभिये यांच्या नेतृत्वात तहसीलदार व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. परंतु प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही. परिणामी मंगळवार २ जानेवारी रोजी शेकडो महिला नगरपंचायतीवर धडकल्या. आम्हाला हक्काचे घरकुल द्या, अशी मागणी करु लागल्या. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान तहसीलदार संतोष महल्ले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून समजूत घातली. पंरतु मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलक वृत्त लिहिस्तोवर आपल्या आंदोलनावर कायम होते. या आंदोलनात रत्नमाला गजभिये, वनीता राऊत, शोभा दोनाडकर, भागेश्वरी सोनटक्के, सुमंत शहारे, सुनीता पिंपळकर, दुर्गा वरके, पुष्पा शहारे, इंदु देसाई, कौशल्या नंदेश्वर, आशा साखरे, ईमल भुते, शकुन कांबळे, रेणुका चौधरी, नमिता कोटरंगे, शिल्पा भावे, सरिता चोपकर यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Lakhandur Nagar Panchayat is under attack for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.