लाखांदूर-साकोली राज्यमार्ग उठला प्रवाशांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:43 AM2018-12-07T00:43:28+5:302018-12-07T00:44:48+5:30

लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाºया नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून दमा व घशाच्या आजाराला समोर जात आहेत, ....

Lakhandur-Sakoli highway passes away | लाखांदूर-साकोली राज्यमार्ग उठला प्रवाशांच्या जीवावर

लाखांदूर-साकोली राज्यमार्ग उठला प्रवाशांच्या जीवावर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाऱ्या नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून दमा व घशाच्या आजाराला समोर जात आहेत, अशी बाब लाखांदुर तालुका राष्ट्रवादी पार्टी यांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर काम शासकीय नियमानुसार करण्याची मागणी केली असून तहसीलदार यांचे मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठविण्यात आले आहे.
सदर रस्त्याचे काम कुठून केव्हा सुरूवात होईल हे सांगता येत नाही. रस्त्याला मधोमध खोदकाम करण्यास सुरुवात केली जाते मात्र यात याच रस्त्यावरून वाहतूक करणाºया प्रवाशाचा कवडीचाही विचार केला जात नाही. संपूर्ण रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी स्लीप होऊन आपले हातपाय गमविण्याची वेळ येऊन ठेपली तरीमात्र कंपनी मालकाची नजर या अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडे अजूनही पडू नये यापेक्षा मोठे आश्चर्य कोणते असावे.
लाखांदुर साकोली रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा महिण्यापासून सुरू असून त्यात तालुक्यातील दिघोरी ते बोरगावपर्यत रस्ता खोदकामामुळे येथून प्रवास करणाऱ्या विध्यार्थांना व ईतर प्रवाशांना खुपच. त्रास सहन करावा लागत आहे.सबंधीत कंपनी चालक पुढाकार घेतानी दिसत नाही. रस्त्याचे चौपदरीकरणाच्या नादात कुण्या गरीबाचे जीव या बांधकामात जाईल हेही नाकारता येऊ शकत नाही. तर काहींना कायमचे अपंगत्व सुध्दा पत्करावा लागू शकतो हेही तेवढेच खरे आहे.
शासन कोणतेही बांधकामाचे टेंडर काढतेवेळी नियम निकस लाऊनच कामाची जबाबदारी एखाद्या ठेकेदाराला देत असतो. काम सुरू असतांना त्या कामापासून कोणत्याही सामान्य मानसाला त्याचा त्रास होणार नाही किंवा कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याच्या येणाºया संपूर्ण खचार्ची जबाबदारी सुध्दा कंपनी मालकाला करणे गरजेचे असते. मात्र साकोली-लाखांदुर महामार्गावर अस काहीही होतानी दिसत नाही. सामान्य नागरीकांना याची जाणीव नसल्या कारणाने कोणीही पोलीसात तक्रार करण्यासही पुढाकार घेत नाही. याच कमजोरीचा फायदा घेत कंपनी चालक मनमर्जी काम चालवून नागरीकांना त्रास देतात.
सबंधीत कामाकडे जिंमेदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गावरील अपघात ग्रस्तांना आर्थीक मदत मिळवून देण्याची गरज भासत आहे. रस्ता निर्मीती करून करोडो रुपये कंपनी मालक कमवून जाईल मात्र या कामासाठी गरीब नागरीकांनी आपले हातपाय गमवून आर्थिक भुर्दड का सोसावा असा प्रश्न सध्या तालुक्यातील नागरीक विचारीत आहे. विकास कामाला कुणीही विरोध करीत नाहीत मात्र विकास करतांनी त्याचा त्रास सामान्य नागरीकांना होणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: Lakhandur-Sakoli highway passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.