लाखांदूर तालुक्यात जि.प.च्या आठ शाळा बंदच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 12:51 AM2016-03-30T00:51:28+5:302016-03-30T00:51:28+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ९० शाळा आहेत. विद्यार्थ्यांची गळती दर वर्षी वाढत असल्याने अनेक शाळा ओस पडु लागल्या आहेत.
व्यथा शिक्षणाची : विद्यार्थ्यांची गळती कारणीभूत
प्रमोद प्रधान लाखांदूर
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ९० शाळा आहेत. विद्यार्थ्यांची गळती दर वर्षी वाढत असल्याने अनेक शाळा ओस पडु लागल्या आहेत. प्राप्त माहीतीनुसार तालुक्यातील तब्बल ८ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यापैकी १ शाळा सन २०१५-१६ या सत्रात बद करण्याची पाळी शिक्षण विभागावर आल्याने शिक्षणाचे पवित्र काम करण्यासाठी शिक्षकाना शाळा शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
लाखांदूर तालुक्यात एकुण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ८५ तर हायस्कुल ५ शाळा आहेत. ३३७ शिक्षक व ६९ शिक्षिका कार्यरत आहेत. मागिल वर्षिच्या तुलनेत २५० विध्याथ्यार्ची गळती चालु वर्षात दिसुन येते. सन २०१४-१५ ला १०,२९० विध्यार्थी तर सन २०१५-१६ या चालु सत्रात केवळ १०,०४४ विध्याथ्यार्नी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला होता. २०१४-१५ ला ४०२ शिक्षक, व ६२ शिक्षिका कार्यरत होत्या. तर सन २०१५-१६ या चालु सत्रात ३३७ शिक्षक व ६९ शिक्षक कार्यरत आहेत. संपुर्ण तालुक्यात केवळ १५ टक्के महिला शिक्षीक असुन तुलनेत शिक्षकांची संख्या जास्त आहे.
शासनाच्या शिक्षण विभागाच्या नव्या ध्येय धोरणानुसार तालुक्यातील ज्या शाळेतील पटसंख्या २० पेक्षा कमी आहे अशा शाळांची माहिती मागीतली होती. माहिती संकलन केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. किन्हाळा येथील शाळा चालु सत्रात बंद करण्यात आली. तर अंतरगाव येथील शाळेत एकूण ८ विद्यार्थी, विहीरगाव ९, चिचगाव २०, चिचाळ २०, झरी १७, जिरोबा १७, बोरगाव येथील शाळेत एकूण १७ विध्यार्थ्यांचे प्रवेश आहेत या सातही शाळा आॅक्सिजनवर असून पुढील सत्रात नक्कीच बंद होणार आहेत.
लाखांदूर तालुक्यात कानव्हेटची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालक व विध्यार्थ्यांचा कल कॉन्व्हेटकडे जास्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक १५ ते ३० कि.मी. लांबून ये-जा करीत असल्यामुळे मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला खो मिळत असल्यामुळे शिक्षणाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे शाळा ओस पडत आहेत. शिक्षण विभागाने शाळेतील प्रगतीकडे लक्ष न दिल्यास तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निम्म्या शाळा नक्कीच बंद पडणार यात शंका नाही.