महाआवास अभियानात लाखांदूर तालुका प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:00+5:302021-08-20T04:41:00+5:30

पुरस्कार विजेत्यांना पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, प्रकल्प संचालक ...

Lakhandur taluka first in Mahaavas Abhiyan | महाआवास अभियानात लाखांदूर तालुका प्रथम

महाआवास अभियानात लाखांदूर तालुका प्रथम

googlenewsNext

पुरस्कार विजेत्यांना पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, प्रकल्प संचालक डॉ. संघमित्रा कोल्हे यांच्या उपस्थितीत महाआवास जिल्हास्तरीय पुरस्कार व विशेष पुरस्कार वितरण करण्यात आले. यशस्वितांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार प्राप्त लाखांदूरचे गटविकास अधिकारी गजानन अगर्ते, सर्वोत्कृष्ट क्लस्टर द्वितीय पुरस्कारप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक शैलेश रंगारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता महेश मुरतेली, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत- मूर्झा, तसेच राज्य पुरस्कृत रमाई व शबरी आवास योजनाअंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कारप्राप्त गटविकास अधिकारी गजानन अगर्ते, सर्वोत्कृष्ट क्लस्टर तृतीय पुरस्कारप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक राजेश हेमने व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रफुल्ल खोब्रागडे आणि सर्वोकृष्ट कर्ज देणारी महिला बचत गट द्वितीय पुरस्कारप्राप्त कल्पतरू महिला बचत गट, जैतपूर या सर्वांचा पालकमंत्री विश्वजित कदम यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

190821\img-20210819-wa0033.jpg

लाखांदूर पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी प्राप्त सन्मानचिन्हांसह

Web Title: Lakhandur taluka first in Mahaavas Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.