लाखांदूरचे जलशुद्धीकरण केंद्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:41+5:302021-08-26T04:37:41+5:30

लाखांदूर नगरपंचायत क्षेत्रात एकूण १७ प्रभाग आहेत. या प्रभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी काही प्रमाणात बोअरवेल सुविधा उपलब्ध ...

Lakhandur water treatment plant closed | लाखांदूरचे जलशुद्धीकरण केंद्र बंदच

लाखांदूरचे जलशुद्धीकरण केंद्र बंदच

googlenewsNext

लाखांदूर नगरपंचायत क्षेत्रात एकूण १७ प्रभाग आहेत. या प्रभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी काही प्रमाणात बोअरवेल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र गत काही महिन्यांपासून स्थानिक लाखांदूर येथील काही प्रभागातील बोअरवेल बंद पडल्याचे वास्तव आहे. तर काही ठिकाणी पाणी पिण्यास योग्य नसल्याची ओरड आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असताना हवामान बदलामुळे विविध आजार बळावले आहेत. तथापि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने नागरिकांना आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन केले जात आहे.

या परिस्थितीत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्याने येत्या काळात विविध आजार बळावण्याची भीती स्थानिक नागरिकांना आहे. गत सहा महिन्यापूर्वी स्थानिक लाखांदूर नगरपंचायत क्षेत्रातील काही प्रभागात पथदिव्यांच्या विद्युत खांबांचे बांधकाम करण्यात आले आहे. या विद्युत खांबांना विजेच्या तारा जोडून विद्युत पुरवठा देखील सुरु करण्यात आला आहे. मात्र वीज काम करणाऱ्यांना इएसएल कंपनीने गत सहा महिन्यापासून पथदिवे लावले नसल्याने नागरिकांना रात्री अंधारातच जावे लागते. पथदिवे अभावी रात्रीच्या सुमारास रस्त्यावर अंधार असल्याने कीटकांचा धोका आहे.

याकडे शासनाने तत्काळ दखल घेऊन स्थानिक लाखांदूर नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराची चौकशी करुन नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.

250821\img20210811063359.jpg

नगरपंचायत कार्यालयानजीकचा जल शुद्धीकरण केंद्र बंद असल्याने त्याजवळीलच नळाचा पाणी भरतांना महिला

Web Title: Lakhandur water treatment plant closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.